टी-20 वर्ल्ड कप सामन्याबाबत मोठी अपडेट; इथे रंगणार क्रिकेटचा थरार!
क्रिकेट हा भारतीयांच्या हृदयाजवळ असलेला विषय आहे. क्रिकेट सामने म्हणजे भारतीयांसाठी सणापेक्षा कमी नाहीत. आपल्या देशात टी-20 वर्ल्ड कप सुद्धा तेवढ्याच प्रेमाने पाहिला जातो.
कोरोनामुळे परिस्थिती बिकट असल्याने, आयपीएल सुद्धा मध्येच थांबवावा लागला होता. आता टी-20 वर्ल्ड कपची वाट सर्व क्रिकेट प्रेमी पाहत आहेत. मात्र, ही स्पर्धा सुद्धा कोरोना मुळे आपल्या देशात होणार नाही.
कुठे रंगणार आहे टी-20 वर्ल्ड कप?
आयसीसीने क्रिकेट T-20 विश्वचषक स्पर्धा यूएई आणि ओमान येथे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
किती टीम घेणार भाग?
या स्पर्धेत 16 संघ सहभागी होणार आहेत.
T20 World Cup to kick off on October 17 in UAE, final on November 14: Report
Read @ANI Story | https://t.co/rDj7q7IP8Q pic.twitter.com/fN7CTABRxN
— ANI Digital (@ani_digital) June 25, 2021
काय असेल वेळापत्रक?
17 ऑक्टोबरपासून वर्ल्डकप टी-20 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी होईल.
काय असेल नियोजन?
पहिल्या राऊंडमध्ये 8 संघांदरम्यान 12 सामने खेळविले जातील. यामधून चार संघ सुपर 12 साठी क्वालिफाय करतील. आठमधल्या चार टीम अव्वल 8 रँकिंगमध्ये सामिल होऊन सुपर 12 मध्ये पोहोचतील. (बांगलादेश, आर्यलंड, नेदरलँड, स्कॉटलंड, नामिबिया, ओमान, पापुआ न्यू गिनी)
यानंतर 12 संघात एकूण 30 सामने खेळले जातील. जे सामने 24 ऑक्टोबरपासून सुरु होतील. सुपर 12 दोन विभागांमध्ये (सहा-सहा) विभाजित केल्या जातील. या मॅचेस तीन ठिकाणी होतील. दुबई अबूधाबी आणि शारजाहला मॅचेस खेळविण्याचा नियोजन होतील. यानंतर तीन नॉक आऊट सामने होतील. दोन सेमी फायनल आणि एक फायनल…!
कोणते मैदान झाले निश्चित?
अबुधाबी, दुबई आणि शारजामध्ये वर्ल्डकपचे सामने खेळवले जातील.
दरम्यान, लवकरच आयसीसीला टी-20 विश्वचषक स्पर्धा युएईमध्ये हलविण्याविषयी बीसीसीआय अधिकृतपणे माहिती देईल. युएईमध्ये विश्वचषक आयोजित करण्यासाठी पूर्ण नियोजन केले गेले आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.