मास्क नाही म्हणून बँक ऑफ बडोद्याच्या गार्डने ग्राहकावर झाडली गोळी; घटनेचा धक्कादायक VIDEO आला समोर
देशभरात कोरोना महामारीच्या काळात प्रत्येकाने मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं आहे. जर कोणी विनामास्क फिरणाऱ्यांना पोलिसांनी कधी कोंबडा केला तर कधी रस्त्यावर बेडूक उड्या मारल्याचे व्हिडीओ आतापर्यंत व्हायरल झाले आहे. तरीही मास्कचा वापर अनेक जण टाळतात. यावरुन अनेक ठिकाणी वादावादीचे प्रसंगीही घडतात. मात्र बरेली येथे मास्क न घालणार्या ग्राहकाला बँक सुरक्षा रक्षकाने थेट गोळी घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नेमके प्रकरण काय?
बँक ऑफ बडोदाचे ग्राहक राजेश राठोड आपल्या पत्नीसमवेत बँकेत आले हाेते. त्यांनी मास्क घातला नव्हता. सुरक्षा रक्षकाने त्यांना थेट गाेळी घातली. त्यांच्या पत्नीने सुरक्षा रक्षकाला जाब विचारला; परंतु तिथे त्यांची कोणीही दखल घेतली नाही. जखमी राठोडला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेबाबत राजेश राठोड यांच्या पत्नी प्रियांका म्हणाल्या की, सुरक्षा रक्षकाने जबरदस्तीने धक्का देत गोळी मारली. मास्क घातला नाही म्हणून मला त्छातीत गोळी मारायची होती परंतू मी त्याच्या पायावर गोळी घातली. एवढ्यावर न थांबता त्या सुरक्षा रक्षकाने त्यांचा मोबाईल ही फोडून टाकला. आम्ही मुलीला फाेन करुन या घटनेची माहिती दिल्याचेही त्यांनी सांगितले.
https://twitter.com/BawaNaaved/status/1408351560137003008?s=20
राठोड यांची मुलगी घटनास्थळी पोहोचली. तिच्यापाठोपाठ पोलिसांचा मोठा फौजफाटाही आला. यावेळी पोलिसांनी बँकेतल्या कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली. यावेळी सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेत विचारपूस केली. यावर सुरक्षा रक्षकाने माझ्या हातुन चुकून गोळी गेल्याचे सांगितले.
सुरक्षा रक्षक केशव कुमारच्या सांगण्यावरून बँकेत बरेच ग्राहक येत होते. काही जणांनी मास्क घातला नव्हता राठोड यांनीही मास्क घातला नव्हता त्यांना मास्क घालण्यास सांगितले. मास्क घातल्यावर त्यांनी माझ्याशी हुज्जत घालण्यास सुरू केले. यात झटापट झाली यातुन माझ्याजवळ असलेल्या बंदुकीतून गोळी त्यांच्या मांडीला लागल्याचे केशव कुमार म्हणाले.
पोलिसांच्या माहितीनुसार जखमी राजेश सध्या बेशुद्ध अवस्थेत आहेत. ते शुद्धीवर आल्यावर त्यांच्या जबाबानुसार पुढील कारवाई होणार आहे. खाजगी सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेतले आहे. आम्ही दोन्ही बाजू ऐकून कारवाई करणार असल्याचे पोलिस अधिकारी रोहित सिंग यांनी सांगितले.
दरम्यान, हा व्हिडीओ पाहून देशातील सद्यपरिस्थितीवर सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात आरोपी गार्डला पोलिसांनी अटक केली आहे.