फ्लिपकार्टचा बिग सेव्हिंग डेज सेल 13 ते 16 जूनच्या दरम्यान सुरु झाला असून यात स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेसवर जबरदस्त डिस्काऊंट मिळत आहे. हा सेल 16 जून पर्यंत सुरु राहणार असून सीएसबीआय कार्ड असलेल्या ग्राहाकंना 10 टक्के इंस्टंट डिस्काऊंट मिळणार आहे. 12 जूनच्या मध्य रात्रीपासून फ्लिपकार्ड प्लस मेंबर्सं साठी हा सेल खुला होईल आणि इतर सर्वांना 13 जून पासून सेलचा लाभ घेता येईल.
फ्लिपकार्डच्या या सेलमध्ये स्मार्टफोन व अँड्रॉईड टीव्ही हे मुख्य आकर्षण असणार आहे. या गोष्टींवर तुम्हाला 62 टक्के पर्यंतच्या डिस्काऊंटसह काही आकर्षक ऑफर देण्यात येणार आहे. जाणून घ्या ऑफर व स्मार्ट अँड्रॉईड टीव्ही विषयी सविस्तर….
१) सॅमसंग 80 cm (32 inch) : एचडी रेडी LED स्मार्ट टीव्ही : 16,999 रुपये
फ्लिपकार्ट वर अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड आणि एसबीआय कार्डसह हा टीव्ही सवलतीत घेता येऊ शकतो. हा टीव्ही फ्लिपकार्टवरून 945 रुपये प्रति महिन्याच्या नो-कॉस्ट ईएमआयवर ऑफर केला जात आहे. या टीव्हीत नेटफ्लिक्स, डिज्नी+हॉटस्टार आणि यूट्यबसारखी अॅप मिळतात. साऊंड आऊटपुट 20 वॉट आहे. स्क्रीन रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज आहे.
२) वनप्लस वाय सिरीज 80 cm (32 inch) : 15,999 रुपये
एचडीएफसी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड ईएमआय ट्रांजक्शनद्वारे हा टीव्ही घेतल्यास 1000 रुपयांची सूट मिळेल. याशिवाय एसबीआय आणि फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड ऑफर सुद्धा आहे. वनप्लसच्या या स्मार्ट टीव्हीत एचडी रेडी स्क्रीन आहे. साऊंड आऊटपुट 20 वॉट तर रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज आहे.
३) रियलमी 80 cm (32 inch) : 13,999 रुपये
रियलमीच्या या टीव्हीवर सुद्धा फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड आणि एसबीआय क्रेडिट कार्ड ऑफर आहे. टीव्ही 2,334 रुपये प्रति महिन्याच्या नो-कॉस्ट ईएमआयवर घेण्याची संधी आहे. या टीव्हीमध्ये 60 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह एचडी रेडी स्क्रीन आणि 24 वाट साऊंड आऊटपुट मिळतो.
४) हायसेन्स A71F 139 cm (55 inch) : 39,999 रुपये
हायसेन्स हा टीव्ही 4,445 रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर घेता येऊ शकतो. या टीव्हीवर एसबीआय क्रेडिट कार्डसह ऑफर आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डसह टीव्ही घेतल्यास 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल. या टीव्हीमध्ये अल्ट्रा एचडी 4के स्क्रीन, 30वाट साऊंड आऊटपुट आणि 60 हर्ट्ज रिफ्रेश रेटची स्क्रीन दिली आहे.
४) Mi 4A PRO 80 cm (32 inch) : 14,999 रुपये
हा टीव्ही सुद्धा फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डसह 5 टक्केच्या सूटसह घेता येऊ शकतो. एसबीआय कार्डसह 10 टक्के सूट असून, टीव्ही 2,500 रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर घेण्याची सुद्धा संधी आहे. या टीव्हीत नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ, हॉटस्टार, यूट्यूब सारख्या अॅप्सचा सपोर्ट आहे. साऊंड आऊटपुट 20वाट आणि स्क्रीन रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज आहे.
महत्वाचं: या ऑफरच्या किंमती वाचकांसाठी ई-कॉमर्स साईट्सवरून घेण्याचा योग्य प्रयत्न केला आहे. यात कंपनीच्या ऑफर्सनुसार क्वचित फरक असू शकतो.