स्मार्टफोन आणि गाडी या अत्यंत आवश्यक गोष्टी झालेल्या आहेत. प्रत्येकाला दैनंदिन जीवनात गरजेच्या असणाऱ्या या गोष्टी आहेत. त्यामुळेच या गोष्टींची चोरी सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असते. गाडी घेणे हे तर प्रत्येकाचे स्वप्न असते. अनेकजण ईएमआय वर गाड्या खरेदी करतात. अनेक जणांच्या गाड्या कर्ज फिटण्याआधीच चोरीला जातात. हे अतिशय दुर्दैवी असते आणि गाडीचे पार्ट बदलले तर चोराला पकडणे सुद्धा अवघड होऊन जाते.
एकदा चोरी झाली की, तो माल चोराचाच म्हणून आपण सोडून देतो. काहीजण पोलीस स्टेशनच्या चकरा मारायला नको म्हणून गोष्टी शोधण्याचा नाद सोडून देतात. मात्र, आता गुगल तुम्हाला गोष्टी शोधायला मदत करणार आहे. 9to5 गुगल च्या वृत्तानुसार, आता गुगल ‘फाईंड माय डिव्हाईस’ नावाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. काय आहे ही सुविधा आणि कोणत्या गाड्या व फोन साठी याचा उपयोग होणार ते जाणून घेऊयात:
समजा तुमचा स्मार्टफोन हरवला तर मी दुसऱ्या अँड्रॉइड मोबाईल वर तुमच्या डिवाइस ची ओनरशिप शेअर करू शकता. यामुळे, त्या डिवाइसवर इंटरनेट कनेक्शन असेल तरीदेखील तुमचा डिवाइस ट्रॅक करणे सोपे होणार आहे. गुगलचा अँड्रॉइड ॲटो इन्फोटेन्मेंट सिस्टीम हा पर्याय तुम्हाला तुमच्या डिव्हाईस च्या अकाउंट वर लॉग इन करायला मदत करेल.
ज्या कार अँड्रॉइड ऑटो इन्फोटेन्मेंट फिचर सह येतात त्यांना देखील ट्रॅक करणे सोपे होणार आहे. या कार कुठे आहेत आणि त्या कुठल्या लोकेशन वर आहेत हे देखील यातून कळेल. एकच फिचर स्मार्टफोन आणि कार दोन्हीही शोधण्यात तुम्हाला साहाय्य करणार आहे.