अँड्रॉइड फोन वापरण्याचं प्रमाण आजकाल वाढत चाललं आहे. त्यानुसार प्रायव्हसीही काही अंशी लोकांच्या अँड्रॉइडच्या वापर करण्यानुसार धोक्यात आहे. आपण मोबाईल खरेदी करतो तेव्हा आपल्याला त्याचा मॉडेल, स्क्रीन, कॅमेरा, इत्यादींची पूर्ण माहिती असते. मात्र, आपल्या मोबाईल फोन मध्ये अशा काही गोष्टी असतात ज्यांची माहिती आपल्याला सिक्रेट कोड डायल करूनच मिळते.
हे कोड ज्यांना माहीत असतात त्यांना अगदी सार व्हॅल्यू, कंपनीचे हार्डवेअर, बॅटरी स्टेट्स इत्यादी टेक्निकल गोष्टी देखील कळू शकतात. या गोष्टी जनरल नॉलेज म्हणून आणि आपल्या फोन बाबत अपडेट असण्यासाठी देखील गरजेच्या असतात. एखादेवेळी फोन रिपेअरिंग वरून आल्यानंतर आपला फोन आतून बाहेरून ओरिजिनल आहे की नाही हे तपासायचे असेल तर असे काही सिक्रेट कोड्स मदत करू शकतात.
जाणून घ्या आपल्या मोबाईल मधील हे महत्त्वाचे सिक्रेट कोड्स :
##4636##: या कोड मधून तुम्हाला बॅटरी, मोबाईल नेटवर्क, वाय-फाय, अॅप युजेजसह बरीच माहिती मिळेल.
*#06#: तुमच्या फोनचा आयएमआय नंबर चेक करण्यासाठी हा कोड डायल करू शकता. IMEI नंबरसह फोनचा MEID नंबर देखील याद्वारे मिळू शकतो.
*#07#: तुमच्या फोनची सार व्हॅल्यू जाणून घेण्यासाठी अँड्रॉइड स्मार्टफोनवरून *#07# डायल करा. यानंतर, सार व्हॅल्यू फोनच्या डिस्प्लेवर येईल.
फोन कंपन्यांचे सिक्रेट सिक्रेट कोड :
#0#: सॅमसंगचा हा सिक्रेट कोड आहे, ज्याचा वापर सॅमसंगच्या फोनमध्ये हार्डवेयरची माहिती मिळवण्यासाठी केला जातो.
*#0228#: सॅमसंगच्या फोन्सवरच हा कोड चालतो. तुम्हाला फोनमधील डिस्प्ले आणि बॅटरीचे स्टेटस याद्वारे समजेल.
##64663##: हा कोड शाओमी युजर्स वापरून हार्डवेयरची माहिती डिस्प्लेवर मिळवू शकतील.
*#800#: हा कोड रियलमी फोन्स करता आहे. हा कोड डायल केल्यावर रियलमी युजर्स फॅक्ट्री मोड आणि फीडबॅक मेन्यू ओपन करू शकतील.