तुम्ही तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये अगोदरपासूनच Installed असलेल्या Clock App नक्कीच पहिले असेल परंतु तुमच्या कधी लक्षात आले आहे का, की जशी-जशी वेळ पुढे जाते तसेच त्या App Icon वरील काटे देखील फिरतात व योग्य वेळ देखील दर्शवतात.
जर एखाद्या नळा मध्ये प्रत्येक सेकंदाला एक थेंब पाणी सांडत असेल तर त्या नळामध्ये एका वर्षाला 11000 हुन अधिक लीटर पाणी वाया जात असेल.
एक साधारण मनुष्य एका रात्रीत 4 स्वप्न पाहतो आणि प्रत्येक वर्षाला जवळजवळ 1460 स्वप्न पाहतो. जर एखादी व्यक्ती मला स्वप्न नाही पडत असे म्हणत असेल याचा अर्थ ती व्यक्ती त्याचे स्वप्न विसरली आहे असा होतो.
इंटरनेटवर सर्वप्रथम खरेदी-विक्री करण्यात आलेली वस्तू हि एक गांजाची पिशवी होती.
जपान या देशातील ऑफिसमध्ये कामादरम्यान थोड्या वेळासाठी झोपण्यास परवानगी आहे. संबंधित कर्मचारी खूप काम केल्याने थोडा वेळ विश्रांती घेत आहे असा तेथील लोकांचा समज होतो. जपानमधील लोकांना जगातील सर्वात मेहनती लोक मानले जाते.
आपण रक्तदान केल्याने एखाद्या गरजू व्यक्तीचा जीव वाचु शकतो. त्याचबरोबर नियमित रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला कॅन्सर आणि हृद्यसंबंधित रोग होण्याची धोका कमी असतो.
एका सामान्य Toyota Car ला बनवण्यासाठी केवळ 15 ते 17 तास लागतात. परंतु एका Rolls Royce कार बनवण्यासाठी 6 महिने इतका कालावधी लागतो विशेष म्हणजे Toyota Car चे सरासरी आयुष्य 15 वर्ष इतके असते परंतु एका Rolls Royce कारचे आयुष्य 100 वर्षांपेक्षा जास्त असते
भारतात एकूण 33 लाख 69 हजार इतक्या लोकांकडे बंदूक ठेवण्याचा परवाना आहे. त्यातील 12 लाख 77 परवाने केवळ एकट्या उत्तरप्रदेश राज्यात आहेत.
रॉयल एनफिल्ड जगातील सगळ्यात जुनी मोटरसायकल कंपनी आहे, जिचे उत्पादन अजूनही सुरु आहे. कंपनीने पहिली मोटरसायकल 1901 मध्ये बनवली होती. या कंपंनीने आजपर्यंत 8.5 लाखांहून अधिक गाडयांची विक्री देखील केली आहे.
सुपरहिट भारतीय चित्रपट K.G.F या मध्ये गरुडा ही खलनायकची भूमिका साकारणारे रामचंद्रन राजू हे खऱ्या आयुष्यात K.G.F फेम अभिनेते यश यांचे पर्सनल बॉडीगार्ड आहेत.