राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत सादर करत आहेत. यामध्ये त्यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा घ्या जाणून….
राज्य अर्थसंकल्प 2021-22 अपडेट :
1) जिल्हा रुग्णालय, मनपा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारणार
2) मनपा, नगरपरिषदा, नगरपंचायतीत आरोग्य पायाभूत सुविधा उभारणार
3) राज्यातील 11 परिचारिक प्रशिक्षण वर्गांचे महाविद्यालयात रुपांतर करण्यात येणार
4) रुग्णालयात आगप्रतिबंधक उपकरणे उभारणार
5) सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगडसह अन्य नाशिक, सातारा वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करणार
6) राज्यातील अर्थसंकल्पात महिलांसाठी काही विशेष योजना
7) नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाच्या कामाचा टप्पा 1 मेपासून सुरु होणार
8) गोसी खूर्द प्रकल्प डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा मानस
9) कृषी पंप जोडणी धोरण राबवणार
10) संत्रा उत्पादकांसाठी नाशिक जिल्ह्यात अन्नप्रक्रिया उद्योग उभारणार
11) 500 भाजीपाला रोपवाटिका उभारणार
12) आरोग्य विभागासाठी 7500 कोटी रुपयांचा प्रकल्प तयार करण्यात येणार असल्याची घोषणा
13) जलसंपदा विभागामध्ये जलस्रोतांची विशेष दुरुस्ती करण्यासाठी आणि जलसंवर्धन योजनेअंतर्गत 12951 कोटी रुपयांचा निधी
14) महाराष्ट्राच्या नव्या पर्यटन धोरणामध्ये 1367 कोटींची तरतूद; महाबळेश्वर-पाचगणी लोणार सरोवराचा विकास आराखडा तयार
15) प्राचीन मंदिरांचे जतन करण्यासाठी 101 कोटी रुपये निधी मंजूर
16) ऊर्जा विभागासाठी 9000 कोटी रुपये मंजूर
17) मुंबईत सांडपाण्यासाठी 19500 कोटी रुपये मंजूर
18) प्रत्येक जिल्ह्यात राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान पार्क उभारलं जाणार त्यासाठी 300 कोटींची तरतूद
19) परळी-वैजनाथ, औंढा नागनाथ, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर तीर्थक्षेत्रासाठी विशेष निधी देणार
20) कृषी पंप जोडणी धोरण राबवणार कृषीपंप जोडणीसाठी महावितरणला 1500 कोटी रुपये
21) 31 लाख 23 हजार शेतकऱ्यांना 19 हजार कोटी थेट वर्ग केले
22) संत्रा उत्पादकांसाठी नाशिक जिल्ह्यात अन्नप्रक्रिया उद्योग उभारणार
23) राज्यात कृषीपंप जोडणी धोरण राबवणार, महावितरणला 1500 कोटी रुपये प्रस्तावित
24) जेजुरीगडासाठी, सांगलीतले बिरुदेव देवस्थानच्या विकास आराखड्यास निधी देणार
25) नागपुरात नव्या प्रशासकीय इमारतीसाठी 250 कोटींचा खर्च