डिजिटल पेमेंट्स कंपनी पेटीएमने नवीन ऑफर खुली केली आहे. ही कंपनी ग्राहक आणि व्यापारी यांच्यासाठी कॅशबॅक योजना (Paytm Cashback) सुरू करणार असून त्यासाठी तब्बल 50 कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. डिजिटल पेमेंट फर्म पेटीएम आपला IPO आणणार आहे. पेटीएम ने आपला IPO लाँच करण्यापूर्वीच एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या अॅपद्वारे व्यवसायिक आणि ग्राहकांद्वारे करण्यात येणार्या ट्रान्जक्शनवर कॅशबॅक देण्याची घोषणा केली आहे.
यासाठी कंपनीने थोडा नाही तर तब्बल 50 कोटी रुपयांचा फंड रिझर्व्ह केला आहे. डिजिटल इंडियाला 6 वर्ष पूर्ण झाली असल्याने कंपनीने ऑनलाइन ट्रांजक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी ही तयारी केली आहे. यासाठी कंपनी 200 पेक्षा जास्त जिल्ह्यांत प्राथमिक स्तरावर ऑनलाइन कार्यवाही करण्याची योजना घेऊन येत आहे. याद्वारे, व्यवसायिकांना डिजिटल पेमेंट करण्याचे प्रशिक्षण देता येऊ शकते. कॅशलेस व्यवहार करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देखील मिळू शकते.
काय म्हणाले पेटीएमचे सीईओ?
पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा असं म्हणाले की, भारताने डिजिटल इंडिया मिशनमध्ये विशेष प्रगती केली आहे. तांत्रिकदृष्ट्या देखील मजबुती आली आहे. पेटीएमचा गॅरंटीड कॅशबॅक अशांना मिळणार आहे जे देशातील टॉप व्यावसायिक आहे आणि ज्यांनी डिजिटल इंडिया यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
केरळ, तेलंगणा, कर्नाटक यासारख्या राज्याचा यात समावेश असणार आहे. देशातील व्यावसायिकांनी डिजिटल इंडियाला यशस्वी करण्यासाठी कष्ट घेतले आहेत. त्यांना आपल्याकडून खास भेट म्हणून आम्ही हे करत असल्याचे पेटीएम चे सीईओ म्हणाले आहेत.