अनेकांना पृथ्वीवरील गोंधळपासून दूर कुठे तरी थोडे दिवस राहावे असे वाटते, तर अनेकांना तेथेच आपले संपूर्ण आयुष्य निवांत घालवावे असे देखील स्वप्न असते. परंतु हे करणे आता कठीण नाही लवकरच असे करणे होणार कठीण….
चंद्रवरील जमीन आणि चंद्रावर यात्रा अशा आश्यर्चरक बातम्या सतत आपल्या कानावर वर पडत असतात. परंतु, आता यासाठी तुम्हाला महिन्याकाठी किती खर्च करावे लागतील याची संपूर्ण अशी माहिती “मनी’ नामक क्रेडिट ब्रोकर कंपनीने दिली आहे.
कंपनीने सांगितलं प्रमाणे…
प्रत्येक ग्राहकाला पसंतीची उत्पादने खरेदी करण्यासाठी काही नामांकित कंपनी कर्ज देते. अश्याच एका कंपनीने नुकतेच आपले एक परिपत्रक जाहीर करून याची सविस्तर माहिती दिली आहे. यात चंद्रावर राहण्यासाठीचा किती खर्च लागले याची संपूर्ण माहिती दिली आहे.
आताच्या माहिती नुसार नासाचे एक पथक 2024 मध्ये चंद्राच्या आर्टेमिस मोहिमेअंतर्गत चंद्रावर स्थायी बांधकामासाठी जागा शोधण्यासाठी जाणार आहे. गाइडनुसार, यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य पृथ्वीवरूनच पाठवले जाईल.
मनी फर्मच्या अंदाजानुसार, कोणाला जर चंद्रावर सर्वप्रथम घर बांधणाऱ्याला साधारण:त 360 कोटी रुपये खर्च करावे लागतील. या खर्च मध्ये मनुश्याला चंद्रापर्यंत चा प्रवास, तेथील साधन सामुग्री, त्याच्याबरोबर मजूर, व कच्चा माल नेणे असा सर्व मिळून एवढा खर्च होईल
याशिवाय चंद्रावर दुसऱ्या घराचा खर्च काही प्रमाणात कमी होण्याचा अंदाज कंपनेने व्यक्त केला आहे. कारण त्याठिकाणी यावेळी सामग्री आणि मजूर चंद्रावर असतीलच. चंद्रावर विशेष प्रक्रियेने अन्न उगवेल. आण्विक भट्टी वीज पुरवेल. यासाठी ग्रीन हाऊस उभे राहतील.
चंद्रावर वीज निर्माण करण्यासाठी छोटे अणुकेंद्र उभारले तर त्यासाठी 1.3 अब्ज डॉलर्स खर्च येईल पण हेच काम 34 सौर पॅनल लावले तर एका घरासाठी वीज निर्माण होऊ शकेल. याचा खर्च साधारण 23616 डॉलर्स इतका असेल असाही अंदाज मनी या नामांकित कंपनीने जाहीर केले आहे.