अखेर 6 दिवसांनंतर सुएझ कालव्यात अडकलेलं महाकाय जहाज हटवलं!; ‘इतक्या’ हजार कोटींचं नुकसान
[sc name=”adg”]
जगात सर्वात जास्त वाहतूक ही जलमार्गाने केली जाते. सुएझ कालवा हा समुद्री मार्गासाठी एक प्रकारे नैसर्गिक वरदानच आहे. इजिप्तच्या या सुएझ कालव्यात गेल्या 6 दिवसांपासून एक महाकाय जहाज अडकलं होतं. अखेर सहा दिवसाच्या मेहनतीनंतर त्या जहाजाला बाहेर काढण्यात यश आलं आहे.
इजिप्तमधील सुएझ कालव्यात गेल्या काही दिवसांपासून अडकलेलं महाकाय जहाज अखेर बाहेर काढण्यात आलं आहे. हे जहाज गाळात रुतल्यामुळे युरोप आणि आशियातील व्यापार ठप्प झाला होता. या मार्गावरील समुद्री वाहतूक करणारे देखील शेकडो जहाजांची रांगच लागली.[sc name=”adg”]
सुएझ कालव्यातून दरवर्षी मालवाहू जहाजांची वाहतूक वाढत आहे. ती 1870 मध्ये 486 होत होती. 2020 मध्ये ही संख्या 19,000 वर गेली. साधारपणे 1.17 अब्ज टन सामानाची ने-आण या कालव्यातून झाली. त्याची 193 किलोमीटर लांबी व 205 मीटर रुंदी आहे. त्यामुळे मोठी जहाजे येथे अडकतात. हे अडकलेले जहाज जपानचे आहे.
नेदरलँडची कंपनी बॉस्केल्सचे कर्मचारीदेखील सूएझ कालवा प्राधिकरणाच्या मदतीला आले आहेत. व्हाइट हाऊसनेही मदतीचे आवाहन केले आहे. सुएझ कालव्यात अडकलेल्या जहाजात आपल्या देशातील तब्बल सर्व 25 कर्मचारी आहेत. ते सर्वजण सुरक्षित आहेत, असे निवेदन सरकारने काढले आहे. जहाजाचे चालक दल भारताचे आहे. त्यांच्या जोडीला इजिप्तचे दोन तज्ज्ञ चालक दाखल झालेत. या जहाजामुळे भारत आणि चीनकडे जाणारे सुमारे 16 तेलवाहू जहाज अडकून पडली आहेत.
[sc name=”adg”]
एवढ्या कोटींचे नुकसान
सुएझ कालवा म्हणजे 193.3 किमीचा चिंचोळा मार्ग आहे. या कालव्यातून एकावेळी एकच जहाज जाऊ शकतं. आशियाई आणि युरोपीय बाजारातील वाहतुकीचा हा महत्वाचा मार्ग आहे. या कालव्यातील वाहतूक थांबली तर जगाला एका तासाला 2800 कोटींचं नुकसान होतं. तर यात सुएझ कालव्यासाठी एकेकाळी मोठमोठी युद्धे देखील झाली होती.
दरम्यान, सुएझ कालवा बंद झाल्याने 4 दिवसात जवळपास 400 जहाजांची वाहतूक बंद झाली आहे. तर दररोज 9.7 बिलियन डाॅलरच्या मालाची वाहतूक देखील थांबली होती.
अमेरिकेने दिलेला मदतीचा प्रस्ताव
अमेरिकेतील वृत्तानुसार व्हाइट हाऊसने इजिप्तला सुएझ कालवा मोकळा करून देण्यासाठी प्रस्ताव दिला होता. इतर देशांकडे जी क्षमता नाही ती आमच्याकडे आहे त्यामुळे हा मार्ग आम्हीच मोकळा करू शकतो असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटलं होतं.जागतिक व्यापाराला मोठा दिलासा
[sc name=”adg”]
https://myletstalks.in/maharashtra-lockdown-u/