Google Pay | गुगलने आपल्या डिजिटल पेमेंट अॅप Digital Payment App जीपेमध्ये नवीन भाषेचा सपोर्ट जोडला आहे. हिंग्लिश भाषा आता यूपीआय-आधारित जीपेमध्ये समाविष्ट झाली आहे. याआधी कंपनीने भारतात याची घोषणा केली होती. अखेर हे नवं अपडेट जारी करण्यात आलं आहे. हिंग्लिश भाषेच्या समर्थनासह, Google Pay मध्ये आता एकूण 10 भाषा आहेत. यामध्ये इंग्रजी, हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, तमिळ आणि तेलगू या भाषांचा समावेश आहे.

Google Pay

Google Pay ने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर हिंग्लिश (Hinglish) भाषेचा सपोर्ट जारी केला आहे. कंपनीने गेल्या वर्षी हिंदी आणि इंग्रजी भाषेच्या या मिश्रणाची घोषणा केली होती, जी आता सर्व वापरकर्त्यांसाठी आणली आहे. नवीन फीचरद्वारे तुम्ही  Google Pay वर इंग्रजीमध्ये हिंदी वाचू शकाल. वापरकर्ते सहजपणे अ‍ॅपला नवीन भाषेत स्विच करु शकतात.

 

या नवीन भाषेच्या समर्थनामुळे केवळ हिंदी वाचता येत नसलेल्या लोकांनाच फायदा होणार नाही, तर इंग्रजी व्याकरणात (English Grammar) कमकुवत असलेल्या वापरकर्त्यांसाठीही हे सोपे होईल. उदा Scan Any QR Code करण्याऐवजी koi bhi QR Code scan karen असे लिहिले जाईल. People च्या जागी Inse Transaction Kiya Gya असे लिहिले जाईल.

 

Hinglish ला डिफॉल्ट भाषा कशी बनवायची ते जाणून घ्या

 सर्व प्रथम Google Pay अ‍ॅप उघडा.
 शीर्षस्थानी असलेल्या तुमच्या प्रोफाइल चित्रावर टॅप करा.
 त्यानंतर Settings वर जा.
 सेटिंग्ज मेनूमध्ये, Personal Info वर टॅप करा.
–  त्यानंतर Language वर जा.
 येथून तुम्ही तुमच्या आवडीची भाषा निवडू शकता.

 

Android आणि iOS साठी  Google Pay दहा भारतीय भाषांना सपोर्ट देते.
गुगल पे च्या या नव्या फिचरचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
तसेच इंग्रजी न येणाऱ्यांसाठी हे फिचर अधिक उपयुक्त ठरणार आहे.

Share.