👉 छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा उत्सव तिथीनुसार या वर्षी 31 मार्च, 2021 रोजी साजरा केला जाणार आहे.
💁♂️ कोविड-19 मुळे उद्धभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी तिथीनुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
[sc name=”adg”]
🧐 ‘या’ मार्गदर्शक सूचना जारी :
▪️ या दिवशी अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती साजरी करावी.
▪️ यावर्षी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये.
[sc name=”adg”]
▪️ तसेच दर वर्षीप्रमाणे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. तर प्रत्येक ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
▪️ शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिबिरे (उदा.रक्तदान/ कोरोना) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे.
[sc name=”adg”]
▪️ आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
▪️ कोविड-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, यांनी केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे
[sc name=”adg”]
📌 दरम्यान, वरील सूचना प्रमाणे नियमांचे पालन करुन शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले असून, अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे असे आवाहन केले आहे.
[sc name=”adg”]