महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. पण राज्यातील कोरोनाचा वाढता प्रसार काही थांबण्याचं नाव घेत नाही. कालची रुग्ण संख्या पाहून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील ही आतापर्यंतची सर्वाधिक आकडेवारी आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाची स्थिती किती विदारक बनत चालली आहे, याचा अंदाज येऊ शकतो.
राज्यात गेल्या 24 तासांत 60 हजाराच्या घरात नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 30 हजार 296 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही आता 5 लाखाच्या वर गेलीय. तर राज्यात सध्या 5 लाख 1 हजार 559 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नव्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 31 लाख 73 हजार 261 झाली आहे. त्यातील 26 लाख 13 हजार 627 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 56 हजार 652 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
गेल्या 24 तासांत टॉप 20 जिल्हातील कोरोनाबाधितांची आकडेवारी
▪️ पुणे : 11023
▪️ मुंबई : 10442
▪️ ठाणे : 7882
▪️ नागपूर : 5721
▪️ नाशिक : 3853
▪️ औरंगाबाद : 1765
▪️ अहमदनगर : 1608
▪️ बुलढाणा : 1563
▪️ नांदेड : 1465
▪️ रायगड : 1213
▪️ जळगाव : 1194
▪️ भंडारा : 1194
▪️ लातूर : 950
▪️ जालना : 921
▪️ सातारा : 903
▪️ धुळे : 848
▪️ सोलापूर : 846
▪️ नंदुरबार : 691
▪️ वर्धा : 687
▪️ बीड : 597
दरम्यान, एकीकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये लसीकरणावरून राजकीय वाद सुरू झालेला असताना राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होऊ लागली आहे.