अहमदनगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने महापालिकेने कोरोना प्रादुर्भाव असलेल्या तीन परिसरात कंटेनमेंट झोन सुरू केले आहेत.
महापालिका आयुक्त शंकर गोरे यांच्या आदेशाप्रमाणे आज बोल्हेगाव परिसरामध्ये पहिला मायक्रो कंटेनमेंट झोन लागू केला आहे.
आज दुपारी दोन वाजल्यापासून ते 26 मार्चपर्यंत हा सूक्ष्म कंटेनमेंट झोन राहणार आहे. या कालावधीमध्ये या सूक्ष्म कंटेनमेंटमधील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहतील.
तर बोल्हेगाव येथील मनोलिलानगर येथील डहाळे ज्वेलर्स ते भानुदास लोटके यांच्या घरापर्यंत हा मायक्रो कंटेनमेंट झोन असणार आहे.
कंटेनमेंट झोनमधील अत्यावश्यक सेवेसाठी उपायुक्त यांच्या नेतृत्वाखाली पथक कार्यरत राहील. कंटेनमेंटमधील आत्यावश्य सेवेसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येईल.
रहदारीसाठी खुल्या असलेल्या मार्गावर येणाऱ्या-जाणाऱ्यांची तपासणी होईल. कंटेनमेंट झोनमध्ये जीवनावश्यक वस्तू या महापालिकेतर्फे पुरवल्या जातील. त्यासाठी यंत्रणा उभी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.