अलिकडच्या काही वर्षांतच डिजिटल पेमेंटचा ट्रेंड मोठ्या वेगाने वाढला आहे. विशेषत: कोरोना महामारी काळात, यूपीआय एका शहरातून दुसऱ्या गावात व्यवहार देखील वाढले आहेत. पूर्वी, जिथे युपीआय पेमेंट फक्त मोठ्या दुकानांपुरते मर्यादित होते, ते आता लहान दुकानांमध्ये, चहाचे दुकान आणि पाणीपुरीच्या गाडी पर्यंत पोहोचले आहे. जवळजवळ प्रत्येक बँकेचे ग्राहक युपीआय पेमेंटचा वापर होतो.
आजची महत्त्वाची बातमी म्हणजे जर तुमचे खाते एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर आज तुम्ही यूपीआय पेमेंट करू शकणार नाही. यूपीआय पेमेंट करण्यात एसबीआय वापरकर्त्यांना अडचण येऊ शकते. देशातील या बड्या सरकारी बँकने या संबंधित माहिती ट्विट करुन सांगतले आहे.
नेमके कारण काय :
एसबीआयने ट्विट करून दिलेल्या माहितीनुसार…; 14 मार्च रोजी म्हणजे आज बँक ग्राहकांच्या चांगल्या सोयीसाठी बँक आपलं यूपीआय प्लॅटफॉर्म सुधारत आहे. बँकाच्या झालेल्या अपग्रेडमुळे एसबीआय ग्राहकांना बँकेचा यूपीआय प्लॅटफॉर्म वापरण्यास अडचणी येऊ शकतात असे बँकेने म्हटले आहे. तर यावर बँकेने पर्यायही सांगितले आहेत.
आज या सेवांचा घेऊ शकता लाभ…
आज एसबीआय वापरकर्ते योनो अॅप, योनो लाइट अॅप, नेट बँकिंग किंवा एटीएम वापरू शकतात अशीही माहिती बँकेने दिली आहे. आज जर अपग्रेडमुळे तुम्हाला यूपीआय सेवा वापरण्यात अडचण येत असल्यास तुम्ही या सेवांचा वापर करू शकता.
15 आणि 16 रोजीदेखील बँकिंग सेवा होतील प्रभावित –
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने दोन दिवसांचा संप पुकारला असून, या संपामुळे 15 आणि 16 मार्च रोजी बँकेच्या शाखा पूर्णपणे बंद राहिल्यास बँक शाखांचे कामकाज ठप्प होईल. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) असेही म्हटले आहे की या संपामुळे बँकेच्या कामावर देखील परिणाम होऊ शकेल.