▪️ संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीदिनी देशातील सर्व कार्यालयांना सुट्टी; केंद्र सरकारने अधिकृत आदेशाद्वारे या निर्णयाची माहिती
▪️ एप्रिलमध्ये सुट्टीच्या दिवशीही कोरोना लसीकरण सुरु राहणार, कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय
[sc name=”adg”]
▪️ अल्पबचत योजनांवरील व्याजदर कपातीचा निर्णय केंद्र सरकारकडून अवघ्या बारा तासात मागे, नजरचुकीने आदेश जारी झाल्याची सारवासारव
▪️ ‘वर्क फ्रॉम होम’साठी राज्य सरकारची चाचपणी; सरसकट लॉकडाऊन ऐवजी राज्य सरकार सर्व खाजगी कंपन्यांना आदेश देण्याची शक्यता
[sc name=”adg”]
▪️ कामाची बोंबाबोंब, वसुली मात्र जोरात; पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर आजपासून टोलमध्ये पाच टक्के वाढ, मुंबईत वांद्रे-वरळी सीलिंकच्या टोलमध्येही आजपासून वाढ
▪️ 12 वी बोर्ड परिक्षेचे हॉलतिकीट विद्यार्थ्यांना 3 एप्रिलपासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध होणार; ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाइन पद्धतीने होणार परीक्षा
[sc name=”adg”]
▪️ महाराष्ट्रातील पालकांची चिंता वाढवणारी बातमी! 10 ते 20 वयोगटात वाढताहेत कोरोना रुग्ण; डॉ तात्याराव लहाने यांचे मोठे वक्तव्य
▪️ जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग झाल्याची आरोग्य यंत्रणेची कबुली; नाशिकच्या देवळा शहरात आजपासून दहा दिवस जनता कर्फ्यू
[sc name=”adg”]
▪️ सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; तामिळनाडू निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतल्याची चर्चा
▪️ लग्नानंतर नववधूला घरी सोडून बुमराहची आयपीएल वारी; ‘इंडिया का त्योहार’ अर्थात इंडियन प्रीमियर लीग 2021 ची प्रतिक्षा अवघ्या काही दिवसांवर