आता गॅस बुकिंगवर मिळेल 900 रुपयांचा कॅशबॅश; जाणून घ्या ते कसे आहे शक्य…
गेल्या काही दिवसांमध्ये इंधन दरवाढ आणि महागाई अशा दुहेरी संकटामुळे सामान्यांच्या किचनमधील बजेट कोलमडले आहे. अशा परिस्थितीत सामान्य नागरिक कोणतीही खरेदी करताना जमेल तितकी बचत करण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच जुलै महिन्याच्या सुरुवातीला विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ झाली आहे. तर व्यावसायिक सिलिंडरची किंमत 84 रुपयांनी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर Paytm ची एक खास ऑफर कॉमन मॅनसाठी फायद्याची ठरू शकते. या ऑफरमुळे तुम्हाला घरगुती सिलेंडरच्या खरेदीवर 900 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल…
Get up to ₹900 cashback while booking your #Indane LPG refill on @Paytm. Book now: https://t.co/4xn4H7wD7R. Terms & Conditions Apply. #LPGBooking pic.twitter.com/gFOsDcnWym
— Indian Oil Corp Ltd (@IndianOilcl) July 20, 2021
कसा मिळवलं ‘या’ ऑफर चा फायदा :
▪️ ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पेटीएम App घ्यावा लागेल.
▪️ App डाऊनलोड केल्यानंतर गॅस एजन्सीद्वारे आपल्याला सिलेंडर बुकिंग करावे लागेल.
▪️ सर्वप्रथम पेटीएम वर जा आणि Show more क्लिक करा यानंतर, ‘Recharge and Pay Bills’ वर क्लिक करा.
▪️ यामध्ये तुम्हाला भारत गॅस, इंडेन गॅस आणि एचपी गॅस असे तीन पर्याय मिळतात. त्यात तुम्ही गॅस सिलिंडर प्रोव्हायडरवर क्लिक करा.
▪️ बुकिंग करण्यापूर्वी तुम्हाला FIRSTLPG चा प्रोमो कोड द्यावा लागेल जेणेकरून तुम्हाला कॅशबॅकची सुविधा मिळेल.
▪️ बुकिंगच्या 24 तासांच्या आत तुम्हाला कॅशबॅक स्क्रॅच कार्ड मिळेल. हे स्क्रॅच कार्ड 7 दिवसांच्या आत वापरावे लागेल.
दरम्यान, येत्या दोन वर्षांत सरकार देशातील लोकांना 1 कोटी मोफत एलपीजी कनेक्शन देणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारीही केली जात आहे. देशातील प्रत्येक घरात एलपीजी कनेक्शन मिळावे यासाठी सरकार उज्ज्वलासारखी योजना चालवित आहे…