तामिळनाडूमध्ये सहा एप्रिल रोजी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष आणि अपक्ष उमेदवार आपले निवडणूक जाहीरनामे प्रसिद्ध करत आहेत.
अनेक जाहिरनाम्यांमध्ये लोककल्याणासंदर्भातील योजनांचा उल्लेख आहे. मात्र, निवडणुकीच्या रिंगात उतरलेल्या सर्वनान या 34 वर्षीय उमेदवाराचा जाहीरनाम सध्या प्रचंड चर्चेत आहे.
[sc name=”adg”]
नेमके जाहीरनाम्यात काय :
तामिळनाडू विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एका अपक्ष उमेदवाराचा जाहीरनामा पाहून तुम्ही थक्क व्हाल. 34 वर्षीय सर्वनान हे दक्षिण मदुराई मतदारसंघात अपक्ष निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
सर्वनानने आपल्या जाहीरनाम्यामध्ये प्रत्येक घरात एक आयफोन, गाडी, हेलिकॉप्टर, रोबोट होडी आणि घरात वापराच्या अनेक वस्तू देण्याचं आश्वासन दिलं आहे. आपल्या जाहीरनाम्यातील सर्व गोष्टी खऱ्या असल्याचं देखील सर्वनान यांनी सांगतले आहे.
[sc name=”adg”]
तर, मी जिंकल्यास मतदारसंघामधील प्रत्येक घरात एक आयफोन, गाडी, हेलिकॉप्टर, होडी, रोबोट तर देईलच पण प्रत्येक घरातील एका व्यक्तीच्या नावे तीन मजल्याचे घरही बांधून देईन. या घराच्या गच्चीवर स्विमिंग पूल असेल, असा दावा सर्वनानने केला आहे.
तसेच तरुणांसाठी एक कोटींचा निधी राखीव असेल. त्याचप्रमाणे चंद्रावर 100 दिवसांसाठी सहल घेऊन जाईन अशा शब्दही सर्वनानने आपल्या मतदारांना दिलाय.
[sc name=”adg”]
अनेकदा निवडणुका जिंकून झाल्यावर नेते त्यांची आश्वासन विसरतात म्हणूनच ते निवडणुकीत वाटेल ती आश्वासनं देतात हा मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न सर्वनानने केल्याचं काहींना वाटत आहे.
[sc name=”adg”]
दरम्यान, या अपक्ष उमेदवाराच्या जाहीरनाम्याची सर्वत्र चर्चा होत असून तरुणांचा राजकारणातील सहभाग वाढण्यासाठी निवडणूक लढत असल्याचे त्यांनी सांगितले