व्हॅलेंटाइन वीकचा आजचा पाचवा दिवस. आज प्रॉमिस डे असून या दिवशी प्रत्येक व्यक्ती पार्टनरला किंवा मित्रांना काहीतरी प्रॉमिस करतात. कधीही सोडून न जाण्याचं प्रॉमिस, नेहमी साथ देण्याचं प्रॉमिस तर आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी आपण एकमेकांची साथ कधीच सोडणार नाही. असे अनेक वेगवगळे प्रॉमिस एकमेकांना करतात.
यादिवशी नव-नव्या जोडप्यांसह प्रेमबंधनात अडकलेले सर्वजण एकमेकांवर आयुष्यभर प्रेम करण्याची आणि प्रेम करणाऱ्यांना सदैव मदत करण्याची वचने देतात. खरंतर महिलांना आपल्या पार्टनरकडून काय व कसे प्रॉमिस हवं असतं किंवा त्यांच्या मनात काय असतं हे सांगणं कुणासाठी देखील जरा कठिणच काम असतं. पण आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरला काही खास नवनवीन प्रॉमिसेस करू शकतात.
वचन दिल्याशिवाय नात्यातील विश्वास वाढत नाही. त्यामुळे प्रत्येकजण प्रेमात पडल्या पडल्या प्रत्येक जोडपं एकमेकांना जपण्याचं, कधीही सोडून न जाण्याचं, नात्यात सदैव प्रामाणिक राहण्याचं, जीवापाड काळजी घेण्याचं अशा अनेक वचनं देतात. वचन हे नात्यात कोणत्याही वस्तूपेक्षा मौल्यवान असल्याने प्रियकर-प्रेयसीच नाही तर आई-वडिल व मुलं, भाऊ-बहिणं, मित्र-मैत्रीण असे सर्वचजण एकमेकांना या दिवशी चांगलं कोणतंतरी वचन देण्यास उत्सुक असतात.