सीताफळ हे बाजारामध्ये सहजासहजी उपलब्ध होणारे फळ आहे मात्र इतर फळांच्या भाऊगर्दीमध्ये आपण सिताफळाकडे दुर्लक्ष करतो. असे असले तरी सीताफळ हे देखील एक चांगले पोषकतत्वे असलेल्या फळाचा शरीराला मोठ्या प्रमाणात लाभ होतो. तसेच यातील अनेक औषधी गुणदेखील शरीराला फायदेशीर ठरतात. याच अनुषंगाने आपण आजच्या या लेखामध्ये सीताफळाच्या सेवनामुळे होणारे फायदे यांविषयी माहिती पाहणार आहोत.
वजन वाढवण्यासाठी :
अनेक जणांची शरीरयष्टी बारीक असते. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा हवा तसा प्रभाव पडत नाही. यासाठी शरीराचे वजन वाढवणे आणि सुडौल दिसणे हे महत्त्वाचे ठरते. आपल्याला सडपातळ शरीरयष्टी तेव्हाच लागते जेव्हा शरीरात ऊर्जेची कमतरता जाणवते आणि ऊर्जा खर्च जास्त होते. त्यामुळे सिताफळाच्या सेवनाने शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते आणि यामुळे आपले वजन वाढण्यास देखील मदत होते. मात्र सीताफळाच्या सेवनासोबतच व्यायाम, योगासने आणि डायट यांवरदेखील लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे
हृदय स्वास्थ्यासाठी :
मानवाचे हृदय हा शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळे हृदयाचे स्वास्थ्य चांगले असणे आवश्यक ठरते. सीताफळ सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. कारण सिताफळामध्ये बी सिक्स नावाचे विटामिन मोठ्या प्रमाणात आढळते. एका संशोधनानुसार बी सिक्स हे विटामिन हृदयरोगाचा धोका कमी करते. तसेच हार्ट अटॅक येण्याची देखील शक्यता यामुळे कमी होते.
पचनशक्ती सुधारते :
आपण जे अन्न खातो त्याचे ऊर्जेत रूपांतर होण्यासाठी शरीराची पचनशक्ती चांगली असणे अत्यंत आवश्यक आहे. सिताफळामध्ये आपली पचनशक्ती सुधारण्यासाठीचे चांगले गुणधर्म असतात. यामध्ये फायबरचा देखील समावेश असतो. फायबरमुळे शरीराची पचनशक्ती सुधारते. तसेच पोटाचे इतरही विकार दूर होण्यास मदत होते.
मधुमेह :
मधुमेह हा असा विकार आहे, ज्यामध्ये शरीरातली इन्सुलिनची मात्रा कमी होऊन ग्लुकोजची मात्रा वाढते. हे टाळायचे असल्यास सिताफळाचे सेवन करणे योग्य ठरते. सिताफळामध्ये अँटी डायबेटीक गुण आढळतात. हे गुण रक्तातील ग्लुकोजच्या स्तरांमध्ये सुधारणा करतात. तसेच मधुमेहाच्या धोक्याला कमी करतात. मात्र सीताफळ हे फक्त मधुमेहाच्या लक्षणांना किंवा त्यापासून होणाऱ्या धोक्यांनाच कमी करते. त्यावर उपचार म्हणून हे लागू होऊ शकत नाही. त्यामुळे याविषयी अधिक चांगला सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून घेतलेला उत्तम.
रक्तदाब :
शरीरातील रक्तदाब सामान्य असणे अत्यंत आवश्यक असते. तो उच्च रक्तदाब असणे किंवा कमी रक्तदाब असणे हे शरीरासाठी घातक समजले जाते. त्यामुळे हा रक्तदाब सामान्य ठेवण्यासाठी सीताफळाचा उपयोग केला जातो. सिताफळामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे घटक असतात. कोणाला उच्चरक्तदाबाची समस्या असल्यास सीताफळाच्या सेवनाने हा रक्तदाब सामान्य करण्यास मदत होऊ शकते. रक्तदाब सामान्य झाल्याने हृदयरोग किंवा स्ट्रोकचा धोका देखील कमी होतो.
ॲनिमिया :
ॲनिमिया हादेखील एक अशा प्रकारचा विकार आहे, ज्यामध्ये शरीरातील रक्त पेशी कमी होतात तसेच शरीरातील विविध भागांमध्ये रक्त आणि ऑक्सिजन पोहोचण्यासाठी अडथळे निर्माण होतात. हा आजार कमी करण्यासाठी किंवा घालवण्यासाठी सीताफळाचे सेवन फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे सीताफळामध्ये क जीवनसत्त्व देखील असते ज्याचा शरीराला फायदा होतो.
त्वचा आणि केस :
वाढते धूळ, प्रदूषण आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी यामुळे अनेक त्वचाविकार तसेच केसांचे विकार होतात. मात्र हे सर्व टाळायचे असल्यास सिताफळाचे सेवन करणे उत्तम ठरते. सीताफळातील क जीवनसत्व सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे आणि केसांचे संरक्षण करण्यास मदत करते. तसेच सीताफळातील झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम असे पोषक घटक केसंसाठी लाभदायक ठरतात.