व्हॅलेंटाइन डे वीकचा चौथा दिवस म्हणजे अर्थातच टेडी डे! कसंही असलं तरी अनेकांना आवडणारं सॉफ्ट टॉय म्हणजे टेडी. हा फतकल मारून बसलेला अस्वल पाहताच आपल्या मनात नक्कीच घर करतो. लहान मूल असो की एखादी तरुणाई तिला टेडी दिला आणि तो तिला आवडला नाही हे खूप कमीच.
म्हणूनच गिफ्ट शॉपमध्ये सर्वात आधी नजर या खूपदा टेडीवरच जाते. किंबहुना गिफ्ट म्हणजे टेडी असं समीकरण देखील जुळून गेलंय. तर व्हॅलेन्टाइन डेचा सप्ताह सुरु असताना या सप्ताहात प्रेमीयुगल एकमेकांना वेगवेगळ्या भेटी देऊन आपल्या भावना व्यक्त करतात.
बाजारात तुम्हाला लहान मोठे असे भरपूर टेडी दिसतील. यातला कुठला टेडी भेट म्हणून द्यायचा यात गोंधळ होत असल्यास तो गोंधळ आधी नक्की दूर करा.. कारण प्रत्येक टेडीचं वेगळं महत्व असतं. आपण आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी योग्य वेळेची प्रतीक्षा करत असतो, हातात हृदय आणि प्रेमाचा संदेश देणारा एक टेडी भेट करा. आपला संदेश आपल्या जोडीदारापर्यंत पोहोचवणं हि एक विशेष भेट आहे.
आकाराने अवाढव्य असलेल्या या टेडीच्या चेहऱ्यावरचे गोंडस भाव पाहून त्याची भीती कोणालाच वाटत नाही. लहान मुलांना तो आपलासा वाटतो. बाजारात तर अगदी 100 रुपयांपासून 10 हजार रुपयांपर्यंतचे टेडी मिळतात. गिफ्टचा जणू ब्रँड अँम्बेसेडरच असलेल्या या टेडीने म्हणूनच व्हॅलेन्टाइन वीकमध्ये स्थान मिळवलंय.
तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या मनात कायमचं स्थान मिळवायचं असेल तर एक मोठा टेडी नक्कीच भेट करा. यानं तुमची जोडीदार नेहमी तुम्ही दूर असल्यावर तुमच्या आठवणीत त्या मोठ्या टेडीजवळ आपल्या सर्व भावना व्यक्त करेल.