कोरोना महामारीच्या थैमानाला आता खरोखरच लोक कंटाळले आहेत. आपल्या जवळील आणि परिसरातील इतरांच्या घरातील होणारे मृत्यू पाहून ‘कोरोना आता थांब रे’ असं सहजपणे लोकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. दुसरीकडे कोरोना लसीकरणाचे कामही वेगाने सुरू आहे. परंतु तरी देखील कोरोनाची तिसरी लाट येणंही निश्चित असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. अशात आता आणखी एका चिंता वाढवणारी बातमी समोर आले आहे.
देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असतानाच आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोकादेखील येणार असल्याचे सांगतले आहे. याबद्दल खुद्द सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांच्यासह काही तज्ञांनी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये ज्याप्रमाणे तीन ते चार महिन्यांचे अंतर होते. तसेच नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमध्ये असेल असे सांगितले आहे.
कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये संसर्गाचा धोका अतिशय कमी होता मात्र तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्गाचा धोका वाढणार असल्याची भीती आता खुद्द वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता पालकांची चिंता वाढले असून तसेच मुलांची विशेष काळजी घेणे या लाटेमध्ये अत्यंत गरजेचे असणार आहे. असे आवाहन आरोग्य यंत्रणा आणि सरकारकडून सातत्याने केले जात आहे.
अशारीतीने ‘घ्या’ लहान मुलांची काळजी :
▪️ मुलांमध्ये जरी सौम्य लक्षणे दिसल्यास त्याकडे पालकांनी अजिबात दुर्लक्ष करू नका. जर मुलांमध्ये जुलाब, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास, थकवा, सुस्तावलेपणा अशी लक्षणे दिसली. तर त्वरित सतर्क व्हा. तसेच तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
▪️ मुलांची कोरोना चाचणी अवश्य करा. त्याशिवाय डॉक्टरांचा सल्ला आणि घ्या. मुलांची कोरोना चाचणीही करा. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुलांना अँटी व्हायरल औषधे, स्टेरॉईड्स, अँटीबायोटिक आदि देणे नुकसानकारक ठरू शकते.
▪️ तर लहान मुलांना मास्क लावायची सवय लावा. मुलांना बाहेरून येणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात येऊ देऊ नका.
▪️ मुलांना कुठल्याही कार्यक्रमात वा बाजारात घेऊन जाणे टाळणे, बाहेरचे पदार्थ खाणे टाळणे याबद्दल सांगत रहा. जर घरामध्ये कुणी आजारी असेल तर मुलांना एन-95 मास्क वापरायला लावा
▪️ रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असा पौष्टिक आहार द्या. तर सध्याच्या वातावरणात आपल्या मुलांना अन्य मुलांसोबत खेळू देऊ नका. त्यासाठी त्यांची समजूत काढा, मुलांचे मनोधैर्य उंचावेल याची काळजी घ्या. त्यांना कोरोनाची भीती घालू नका. मात्र शास्त्रीय पद्धतीने माहिती द्या