इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी, भारतीय संघाची घोषणा; असा आहे संघ
इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी शुक्रवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंड दौऱ्यावर अनुभवी शिखर धवनला संधी मिळेल, अशी चर्चा होती. पण त्याला संघात स्थान मिळालेले नसून युवा शुभमन गिलवर निवड समितीने विश्वास दाखवला आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसह भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.
तर अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, आरझन नागवासवाला या युवा खेळाडूंना राखीव प्लेयर्स म्हणून निवडण्यात आले आहे. याशिवाय अपेंडिक्समुळे त्रस्त असणाऱ्या लोकेश राहुलसह आयपीएल स्पर्धेवेळी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या विकेटकीपर बॅट्समन वृद्धिमान साहासंदर्भातील निर्णय राखून ठेवण्यात आला असून फिटनेसवर ते इंग्लंडला जाणार की नाही हे निश्चित होणार आहे.
असा आहे भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वाशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इंशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव.
The All-India Senior Selection Committee has picked the Indian squad for the inaugural ICC World Test Championship (WTC) final and the five-match Test series against England. #TeamIndia pic.twitter.com/emyM8fsibi
— BCCI (@BCCI) May 7, 2021
भारताचा इंग्लंड दौरा
18 ते 22 जून – कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना (भारत विरुद्ध न्यूझीलंड), साऊथँम्पटन
कसोटी मालिका – इंग्लंड विरुद्ध भारत
4 – 8 ऑगस्ट – पहिला कसोटी सामना, नॉटिंगघम
12 – 16 ऑगस्ट – दुसरा कसोटी सामना, लॉर्ड्स
25 – 29 ऑगस्ट – तिसरा कसोटी सामना, हेडिंग्ले
2 – 6 सप्टेंबर – चौथा कसोटी सामना, लंडन
10 – 14 सप्टेंबर – पाचवा कसोटी सामना, मँटेस्टर
प्रिय वाचकांनो सविस्तर माहिती लवकरच अपडेट केली जाईल….