झोप न येणे ही सामान्य समस्या झाली आहे. उतारवयात झोप कमी होते हे जरी खरे असले तरी अनेकांना वय कमी असताना अशा त्रासाला सामोरे जावे लागते. मात्र, यावर उपाय करणे आवश्यक आहे.
झोप अर्धवट झाल्याने किंवा अपुरी झाल्याने पचनक्रिया, जेवणाच्या वेळा आणि त्वचेवरही परिणाम होतो. अशक्तपणा जाणवणे यातूनच उदभवते. करंगळीच्या बाजूचे बोट दाबून बघा, पंचधातूंचे भांडे तळपायावर रगडून बघा अशी अनेक उदाहरणे देऊन लोक सल्ले देतात.
मात्र, काही नियम आपण स्वतःच पाळले तर उपाय करायची वेळ येत नाही. 10-3-2-1 हा फॉर्म्युला पाळल्याने तुम्हाला कोणतीच समस्या निर्माण होणार नाही.
लंडनस्थित सुप्रसिद्ध डॉक्टर राज यांनी हा फॉर्म्युला सांगितला आहे. काय आहे या फॉर्म्युल्यात जाणून घ्या:
10- झोपेच्या 10 तास आधी कॉफी पिणे थांबवा. कॅफेनचे प्रमाण शरीरात जास्त असले की, झोप येण्यास त्रास होतो.
3- रात्री झोपेच्या 3 तास आधी जेवण करा. त्यामुळे ऍसिडिटी, बद्धकोष्ठता असे त्रास होणार नाहीत कारण अन्नपचन व्यवस्थित होईल.
2- झोपण्याआधी 2 तास सगळी कमाई बंद ठेवा. विशेष म्हणजे ऑफिस ची कामे ज्यात मेंदू जास्त सक्रिय राहतो ती कामे थांबवा. मेंदू रिलॅक्स झाला की आपोआप वेळेत झोप येईल.
1- झोपेपूर्वी 1 तास मोबाईल, इंटरनेट आणि कॉम्प्युटर चा वापर बंद करा. याने मेंदूला येणारा शीण कमी होईल. मोबाईल, कॉम्प्युटर च्या लाईटमुळे डोळ्यांना त्रास होणार नाही. झोप शांत लागेल.