फक्त नोकरी स्वीकारा; कंपनी देणारे BMW बाईक आणि जॉइनिंग बोनस, या कंपन्यांची अनोखी ऑफर जाणून घेण्यासाठी वाचा!
नोकरी कोणाला नको असते? मात्र, नोकरीमधून मिळणारा पैसा आणि फायदा देखील महत्वाचा असतो. एखादी नोकरी तुम्हाला पैसा, गाडी, मोबाईल आणि जॉइनिंग बोनस देखील देत असेल तर? तुम्ही अर्थात ती नोकरी एका पायावर स्वीकाराल नाही?
आयटी कंपनी मध्ये नोकरी करायला अनेक लोक तयार असतात. फ्रेशर्स, एक्सपिरिएन्स्ड प्रत्येकाला मोठ्या पगाराची नोकरी हवी असते. कोरोना महामारी पासून, अनेक लोक घरून काम करणे पसंत करतात.
तुम्हाला आयटी मधील आधी काही अनुभव असेल तर, तुम्ही आयटी कंपनीमध्ये नोकरी स्वीकारून बक्कळ फायदा मिळवू शकता. खाली कंपन्यांची यादी आणि त्या पुरवतात ते फायदे दिलेले आहेत. इंटरव्ह्यु क्रॅक करा आणि मिळवा नोकरी तीही सर्वोत्तम!
कोणत्या कंपन्या देतात मूल्यांकन चाचणीसाठी पैसे?
मीडिया रिपोर्ट्स नुसार, फिनटेक फर्म BharatPe कंपनी नवीन प्रवेश करणाऱ्यांना BMW बाईक देत आहे. याशिवाय, काही कंपन्या आयफोन आणि फ्लेक्सी-वर्किंग टाईमींग देखील देत आहेत. या कंपन्या काही उमेदवारांना त्यांच्या मूल्यांकन चाचणीला उपस्थित राहण्यासाठी 1हजार ते 5 हजार रुपये देत आहेत.
आयटी कंपन्यांमध्ये टॅलेंटची मागणी जोरावर :
सल्लागार कंपन्यांचे म्हणणे आहे की, एप्रिल महिन्यापर्यंत या आयटी कंपन्यांकडून उमेदवारांची मागणी 5 हजारांच्या आसपास होती, परंतु आता ती जूनच्या अखेरीस 20 हजारपर्यंत वाढली आहे.
टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल आणि विप्रो सारख्या कंपन्या चालू आर्थिक वर्षात एकूण 1 लाख लोकांना रोजगार देतील अशी अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त, कॉग्निझंट या वर्षी 1 लाख अनुभवी आणि 30 हजार फ्रेशर्स उमेदवारांची नियुक्ती करणार आहे.
येता काळ आयटी कंपन्यांसाठी सुवर्णमयी असणार आहे. त्यामुळे, तुम्हीही आपल्या टॅलेंटच्या जोरावर संधीचे सोने करू शकता!