🌱 मिरची हि आपल्या दैनंदिन आहारातील अविभाज्य भाग असल्याने वर्षभर मिरचीला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. याच अनुषंगाने तुम्हीही मिरची लागवड करण्याच्या विचारात असाल तर खाली दिलेल्या मिरचीच्या जाती नक्की अभ्यासा.
🧐 मिरच्यांच्या काही महत्वाच्या जाती :
1️⃣ अग्निरेखा : या जातीच्या मिरच्या या मोठ्या आकाराच्या असून अंदाजे 11 सेंटिमीटरपर्यंत लांब असतात. प्रामुख्याने या मिरच्या हिरव्या रंगाच्या असून त्यावर काही प्रमाणात सुरकुत्या असतात. या मिरच्या भुरी तसेच मर रोगाला सहजासहजी बळी पडत नाहीत.
[sc name=”adg”]
2️⃣ ब्याडगी : या मिरच्यांचा तिखटपणा अतिशय कमी असून फळांची साल हि जाड असते. मिरचीची लांबी अंदाजे 12 सेंटिमीटरपर्यंत येऊ शकते. तसेच या मिरचीवर सुरकुत्यांचे प्रमाण हे जास्त असते. मात्र साठवणुकीच्या दृष्टीने या मिरचीचा रंग चांगला टिकून राहतो.
[sc name=”adg”]
3️⃣ मुसळेवाडी सिलेक्शन : या मिरचीवर काळे चट्टे असून मिरचीचा रंग हा गार्ड हिरवा असतो. फळांची लांबी अंदाजे 7 सेंटीमीटर पर्यंत असते. वाळल्यावर या मिरचीचा रंग गडद लाल होतो आणि तो टिकतोदेखील. उन्हाळी तसेच खरीप हंगामासाठी महाराष्ट्रात हे वाण उत्तम समजले जाते.
[sc name=”adg”]
4️⃣ फुले सई : या मिरचीचे फळ हे अंदाजे 8 सेंटीमीटर लांबीपर्यंत असू शकते तर झाडांची उंची हि मध्यम स्वरूपाची असते. मिरचीचा तिखटपणा हा मध्यम स्वरूपाचा असतो. हि जात करपा रोगास प्रतिबंध करते.
[sc name=”adg”]
5️⃣ ज्वाला : मिरचीची हि जात हिरव्या मिरचीसाठी चांगली समजली जाते. कारण लाल मिरची तोडून वाळवल्यावर तिचा साठा केल्यावर ती पांढरी पडते. या फळांची लांबी हि अंदाजे 12 सेंटिमीटरपर्यंत लांब असू शकते. तसेच हिचा तिखट गुणधर्म हा जास्त असतो.
🎯 हि माहिती नक्की शेअर करा..!