पीएम किसान योजनेच्या हप्त्याविषयी महत्वाची माहिती, या तारखेला मिळणार हप्ता; रजिस्ट्रेशन केले नसेल तर त्वरा करा!
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. यावर्षात 3 हप्ते मिळणार असून, त्यातील 2 बाकी आहेत. मात्र, आता नवव्या हप्त्याबाबत मोठी माहिती मिळत आहे. नववा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 9 ऑगस्ट रोजी हा हप्ता खात्यावर जमा होणार आहे. आतापर्यंत या योजनेसाठी तुम्ही रजिस्ट्रेशन केले नसेल तर आताही वेळ आहे!
याच आठवड्यात रजिस्ट्रेशन करून तुम्ही या योजनेचा लाभ मिळवू शकता. गेल्या 2 महिन्यात तब्बल 21 हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. जर या आठवड्यात तुम्ही रजिस्ट्रेशन केले तर, तुम्हाला 8वा आणि 9वा हप्ता एकदाच मिळेल. म्हणजे 4 हजार रूपये तुमच्या खात्यात जमा होतील.
अर्थात, यासाठी तुम्ही पात्र आहात का याची पडताळणी होईल. पात्र असणारे शेतकरी ऑनलाइन आणि ऑफलाइन सुद्धा नोंदणी आता करू शकणार आहेत. दोन्हीही पद्धतीने नोंदणी खुली करण्यात आलेली आहे.
प्रधानमंत्री श्री @narendramodi जी "प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना" के तहत किसानों के खातों में डीबीटी के माध्यम से 9वीं किस्त बटन दबाकर प्रदान करेंगे।#PMKisan pic.twitter.com/urEL8UfplS
— Narendra Singh Tomar (@nstomar) August 6, 2021
अशा प्रकारे अर्ज करा
पीएम-किसान पोर्टलला भेट द्या. ( pmkisan.gov.in )एक पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला फार्मर कॉर्नर्सचा पर्याय दिसेल. त्यावर नवीन फार्मर रजिस्ट्रेशन मिळेल. यावर क्लिक करा. यानंतर तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल.
फॉर्म पूर्ण भरा, त्यात योग्य माहिती भरा.
यामध्ये तुम्हाला आधार कार्ड आणि कॅप्चा टाकण्यास सांगितले जाईल. तो भरल्यानंतर Click Here वर क्लिक करावे लागेल.
यावर क्लिक केल्यावर एक नवीन पान उघडेल, ज्यात तुम्हाला फॉर्म दिसेल. हा फॉर्म पूर्ण भरा, त्यात योग्य माहिती भरा.
सातबारा क्रमांक आणि खाते क्रमांक भरून सेव्ह करा. यामध्ये बँक खात्याची माहिती भरताना आयएफएससी कोड व्यवस्थित भरून सेव्ह करा.
त्यानंतर दुसरे पान उघडेल, ज्यात तुम्हाला तुमच्या जमिनीचा तपशील विचारला जाईल. सातबारा क्रमांक आणि खाते क्रमांक भरून सेव्ह करा. तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
शेतकऱ्यांना 4000 हजार रुपये मिळणार?
पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या संबंधित या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 4000 हजार रुपये मिळण्याची संधी आहे. यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. या वर्षाचा पहिला हप्ता जारी झालाय आणि दोन हप्ते शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत पात्र शेतकरी ज्यांनी अद्याप नोंदणी केली नाही, जर त्यांनी स्वतःची नोंदणी केली, तर त्यांना आठव्या आणि नवव्या हप्त्याचे 2-2 हजार मिळू शकतात म्हणजे एकूण चार हजार रुपये मिळणार आहेत.
मोदी सरकारची सर्वात यशस्वी योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान सन्मान योजना जाहीर केली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरली होती. तेव्हापासून शेतकऱ्यांच्या खात्यात 8 हप्त्यांमध्ये पीएम किसान योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. योजनेचा नववा हप्ता 9 ऑगस्टला जारी होत आहे.