फुटबॉल विश्वातील एका बातमीने मागील काही दिवसांपूर्वी सर्व फुटबॉलप्रेमींना मोठा धक्का दिला आहे. कारण, स्टार फुटबॉल खेळाडू लिओनेल मेस्सीने बार्सिलोना फुटबॉल क्लबला काही दिवसांपूर्वी निरोप दिला आहे. नंतर, अर्जेंटिनाच्या या फुटबॉलपटूने एक पत्रकार परिषद घेऊन या बातमीवर अधिकृत शिक्कामोर्तब केला.
लिओनेल मेस्सीचं (Lionel Messi) बार्सिलोनामधून बाहेर पडणं अनेक फूटबॉल चाहत्यांसाठी भावनात्मक क्षण होता. अर्जेंटिनाचा सुपरस्टार असलेल्या मेस्सी एफसी बार्सिलोना सोडताना अश्रूही अनावर झाले. बार्सिलोनामधून बाहेर पडण्याआधी केलेल्या अखेरच्या भाषणात मेस्सी ढसाढसा रडला. बार्सिलोनाचे प्रेक्षक आणि माध्यम प्रतिनिधींनी उभं राहून दीड मिनीटं मेस्सीच्या वागणुकीचे कौतुक देखील केलं, त्यावेळी मेस्सीच्या डोळ्यातून अश्रू येत होते. या दरम्यान, त्याने अश्रू पुसण्यासाठी एक टिश्यू वापरला होता. त्यावेळी मेस्सीने वापरलेला हा टिश्यू पेपर आता चक्क विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे.
नेमके प्रकरण काय?
अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीनं बार्सिलोनामधून बाहेर पडण्याची केलेली घोषणा हा सर्व फुटबॉल चाहत्यांसाठी एक भावनिक क्षण होता. निरोपाच्या भाषणात मेस्सी भावूक झाल्याचं सर्व जगानं पाहिलं. निरोप घेताना त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. दीड मिनिटांपेक्षा जास्त वेळ मेस्सी स्टेजजवळ त्याच अवस्थेत उभा राहिला होता. जेव्हा मेस्सीचं कौतुक केलं जात होतं, तेव्हा त्याला त्याचे अश्रू आवरता आले नाहीत.
Por si ocupan…
En internet se vende en un millón de dólares el pañuelo que uso Messi en su despedida. 💰 pic.twitter.com/c0gfTohsnl
— ZEL (@Mariazelzel) August 18, 2021
निरोप समारंभाच्या भाषणात या महान खेळाडूला रडताना पाहून त्याची पत्नी अँटोनेलाने त्याला अश्रू पुसण्यासाठी एक टिश्यू पेपर दिला होता. याच टिश्यू पेपरची किंमत आता करोडो रुपये झाली आहे. एका अहवालानुसार, मेस्सीच्या अश्रूंनी भरलेला हा टिश्यू पेपर सुमारे 7.43 कोटी रुपयांना विकला जात आहे. या टिश्यूच्या अवाजवी दराने विक्रीसाठी एक ऑनलाइन जाहिरातही देण्यात आली आहे.
मैकेडुयो नावाचा एक व्यक्ती मेस्सीच्या अश्रूंचा टिश्यू विकत आहे. मेस्सीचा अनुवंश (जेनेटिक) या टिश्यूमध्ये आहे. ज्यामुळे लोकांना फुटबॉल खेळाडूचा क्लोन करता येईल. या 34 वर्षीय खेळाडूने बार्सिलोनासोबत 21 वर्षे घालवल्यानंतर आता निरोप दिला. यानंतर तो त्याच्या पॅरिस सेंट-जर्मन या नव्या संघासाठी खेळेल.
लिओनेल मेस्सी 29 ऑगस्ट किंवा 12सप्टेंबर रोजी पीएसजी (पॅरिस सेंट-जर्मन) तून पदार्पण करणार आहे. पीएसजीसोबत मेस्सीने दोन वर्षांचा करार केला आहे. पीएसजी मेसीला तब्बल 35 मिलियन युरो म्हणजे जवळपास 300 कोटी रुपये देणार आहे. तर अनुभवी नेमारला पीएसजी 37 मिलियन युरो देते.
मेस्सीची बार्सिलोनासाठी कार्यकिर्त
लियोनेल मेस्सी 672 गोलसह बार्सिलोनासाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. बार्सिलोनाकडून त्याने 778 मॅच खेळल्या, जे एक रेकॉर्ड आहे. तो 520 मॅचमध्ये 474 गोल करून स्पॅनिश लीगमध्येही टॉप स्कोरर आहे. बार्सिलोना सोडल्यानंतर मेसी म्हणाला, की तो चॅम्पियन्स लीग ट्रॉफी जिंकण्यासाठी योग्य ठिकाणी पोहोचला आहे. नेमारसोबत खेळायला मिळणं हेदेखील पॅरिस सेंट जर्मेनशी जोडलं जाण्याचं कारण होतं, असंही मेसीने सांगितलं.