पोस्टाच्या योजनेतून अनेक लोक गुंतवणूक करताना दिसतात. अनेक योजना पोस्टाच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत फायदेशीर सोयी पुरवतात. दिवसाला कमीतकमी गुंतवणूक सातत्याने केल्याने काही वर्षात तुम्ही छानसे पैसे मिळवू शकता, आणि ही आर्थिक साक्षरता तुम्हाला हवी!
आज आपण पोस्टाच्या संतोष योजनेविषयी काही माहिती जाणून घेऊ ज्यात तुम्ही रोज 44 रुपये गुंतवून लाखो मिळवू शकता.
या पॉलिसीला मुख्य रुपाने दोन भागात वाटण्यात आले आहे. पहिला भाग जे लोक ग्रामीण भागात राहतात त्यांच्यासाठी. दुसरा भाग जे लोक नोकरदार आहेत त्यांच्यासाठी. पोस्टल लाईफ इन्श्युरन्सअंतर्गत पाच प्रकारच्या पॉलिसी चालवल्या जातात. यामध्ये संतोष, सुरक्षा, युगल सुरक्षा, बाल जीवन आणि सुमंगल यांचा समावेश आहे.
पोस्ट ऑफिसात 5 वर्षांसाठी सुद्धा पॉलिसी असतात. यामध्ये खास बाब ही की 5 वर्षांसाठीसुद्धा बोनसचा दर समानच असतो जो एरवी इतर पॉलिसीसाठी असतो. पोस्ट ऑफिसकडून बोनसचा दरसुद्धा खूपच चांगला दिला जातो.
सर्वांसाठी नाही ही पॉलिसी
पोस्टल इन्श्युरन्स प्लॅनमध्ये संतोष पॉलिसीचा उल्लेख मोठ्या प्रमाणावर होतो. हा एक अॅनॉमेंट प्लॅन आहे ज्यात सम अश्युअर्डसोबत बोनसदेखील मिळतो. ही स्कीम केंद्र सरकारकडून चालवली जाते. जे लोक सरकारी किंवा निमसरकारी कर्मचारी आहे किंवा प्रोफेशनल आहे ते ही पॉलिसी घेऊ शकतात.
यासाठी एक उदाहरण पहा
30 वर्षांच्या योगीताने संतोष पॉलिसी घेतली आहे, ज्याचे सम अश्युअर्ड 5 लाख रुपये आहे आणि ही पॉलिसी 30 वर्षांसाठी आहे. ही पॉलिसी योगिता 60 वर्षांची झाल्यावर मॅच्युअर्ड होईल.
मॅच्युरिटीला किती पैसे मिळतात
या पॉलिसीसाठी योगीताला दर महिन्याला 1332 रुपये जमा करावे लागतील. एक वर्षाकाठी ही रक्कम 15,508 रुपये इतकी होईल. या पद्धतीने पाहिल्यास दररोज 44 रुपयांची बचत करावी लागेल. सर्व गणित पाहिल्यास रमेशला पूर्ण पॉलिसी कालावधीत म्हणजेत 30 वर्षांपर्यत एकूण 4,55,551 रुपये जमा करावे लागतील. 30 वर्षानंतर पॉलिसी मॅच्युअर्ड होईल आणि योगीताला 12,80,000 रुपये मिळतील.