कोरोनामुळे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. अनेक जण आपापल्या परीने नवीन मार्ग शोधून पैसे कमावण्याचा विचार करत आहे. काय करता येईल ज्याने आपल्याला हवा तो व्यवसाय सुरू होईल या विचाराने प्रत्येकजण ग्रासला आहे.
अशातच सरकार नवउद्योजकांना चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आखणी करत आहे, वेगवेगळ्या योजना राबवत आहे. आज आपण प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती करून घेणार आहोत.
काय आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना
कृषी संबंधित व्यवसाय जसे मत्स्य पालन, मधमाशी पालन, कुक्कुट पालन, पशुधन पालन, ग्रेडिंग, कापणी, कृषी उद्योग एकत्रीकरण, डेयरी, मत्स्य पालन, कृषी क्लिनिक आणि कृषी व्यवसाय केंद्र, खाद्य आणि कृषी-प्रक्रिया, इत्यादी पीएमएमवाय अंतर्गत पात्र आहे.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचे लाभार्थी : प्रोप्रायटर, पार्टनरशिप, सर्व्हिस सेक्टरच्या कंपन्या, मायक्रो उद्योग, दुरूस्ती दुकाने, खाण्यासंबंधी व्यापार, विक्रेते, ट्रक मालक, मायक्रो मॅन्युफॅक्चरिंग फर्म.
तीन कॅटेगरीत मिळते कर्ज
1. शिशु कर्ज योजना- यामध्ये 50,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळते.
2. किशोर कर्ज योजना- यामध्ये 50,000 रुपये ते 5 लाखापर्यंत कर्ज मिळते.
3. तरुण कर्ज योजना- यामध्ये 5 लाख ते 10 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते.
अर्ज कसा करायचा?
▪️ कर्जासाठी ओळखीचा पुरावा – वोटर कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट,
▪️ फोटो आयडी. पत्त्याचा पुरावा – टेलीफोन बिल, इलेक्ट्रिसिटी बिल, प्रॉपर्टी टॅक्स रिसेप्ट, आधार कार्ड, पासपोर्ट. अर्जदाराचा फोटो (6 महिन्यापेक्षा जुना नसावा).
▪️ जातीचा दाखला SC/ST/OBC. ओळखीचा दाखला/ बिझनेस एंटरप्रायसेस, हे कागदपत्र आवश्यक आहेत. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जा (http://www.mudra.org.in/)