वाहनांच्या सुरळीत वाहतुकीसाठी रस्ते वाहतूक आणि हायवे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. भारतात नवीन नोंदणी चिन्ह जाहीर करण्यात आले आहे. याचा अर्थ यापुढे वाहनांना भारत सिरिज म्हणजे वाहनांच्या क्रमांकाआधी BH असे लिहिलेले असणार आहे. याआधी वाहनांच्या क्रमांकाच्या आधी राज्याचे चिन्ह लिहिलेले असायचे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील गाडी असल्यास त्यावर MH असं लिहिलेलं असायचं. पण, आता BH असे लिहिलेली काही वाहने आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळू शकतात.
BH-series असलेल्या वाहनांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करताना कोणतीही अडचण येणार नाही. देशभरात प्रवास करणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. सरकारच्या या नियमांमुळे देशांतर्गत प्रवास करणाऱ्या वाहनांच्या मालकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शिवाय त्यांना विनाकारण होणाऱ्या चौकशीपासून वाचता येणार आहे. सध्याच्या वाहनांना ही सुविधा उपलब्ध नाही. नवीन वाहनांना BH-series मिळवता येणार आहे.
नवीन वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बीएच नोंदणीचा पर्याय मिळणार आहे. ज्या लोकांच्या नोकरीनिमित्त राज्ये बदलावी लागतात, त्यांना बीएच नोंदणीचा चांगला पर्याय असणार आहे. जर बीएच नोंदणीमध्ये वाहनाची नोंदणी केली तर दुसऱ्या राज्यात जाताना वाहन मालकांना नव्याने नोंदणी करावी लागणार नाही. यापूर्वी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात राहण्यासाठी गेलेल्या वाहन मालकांना वाहनांची नव्याने नोंदणी करावी लागत होती. नवीन सीरीज जुन्या वाहनांना लागू होणार नसली तरी देखील नवीन वाहने घेणाऱ्या लोकांसाठी फायद्याची ठरणार आहे.
कोणाला मिळणार ही सुविधा…
डिफेन्स, केंद्र, राज्य सरकारी कर्मचारी, खासगी कंपन्या ज्यांची कार्यालये 4 किंवा त्यापेक्षा अधिक राज्यांमध्ये आहेत.
BH रजिस्ट्रेशन अशा प्रकारे दिसेल
BH रजिस्ट्रेशनचा फॉर्मेट YY BH 5529 XX YY असा ठेवण्यात आला आहे, ज्यामध्ये पहिल्या रजिस्ट्रेशनचे वर्ष BH – भारत सीरीज कोड 4 – 0000 ते 9999 XX अल्फाबेट्स (AA ते ZZ)