2014 नंतर 2019 मध्ये केंद्रात बहुमताने सत्तारुढ झालेल्या नरेंद्र मोदी सरकारचा दुसऱ्या टर्ममधील पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार पार पडतो आहे. सरकार स्थापन होऊन जवळपास दोन वर्ष उलटल्यानंतर आता मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होतोय. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार थोड्या वेळात होणार आहे. केंद्र सरकारने मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या 43 नेत्यांची यादी जाहीर केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. एकूण 43 मंत्री मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यापैकी 10 मंत्र्यांना बढती देण्यात येणार असून 33 नव्या चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश होत आहे. तर दीर्घकाळापासून मोदींच्या मंत्रिमंडळात असलेल्या अनेक दिग्गज नेत्यांना नारळ देण्यात आला आहे. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आले आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मोदी सरकारमधील कायदे आणि आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही मंत्रिमंडळ विस्ताराला काही वेळ उरला असताना मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडे यांचाही राजीनामा घेण्यात आला आहे. तत्पूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी आरोग्यमंत्री हर्षवर्धन, रोजगारमंत्री संतोष गंगवार आणि सदानंद गौडा यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.
जाणून घेऊया 43 नव्या मंत्रांची यादी :
या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश
नारायण राणे
सर्बानंद सोनोवाल
डॉ. विरेंद्र कुमार
ज्योतिरादित्य सिंधिया
रामचंद्र प्रसाद सिंग
अश्विनी वैष्णव
पशुपती कुमार पारस
किरेन रिजीजू
राजकुमार सिंह
हरदीप सिंह पुरी
मनसुख मंडाविया
भुपेन्द्र यादव
पुरुषोत्तम रुपाला
जी. किशन रेड्डी
अनुराग सिंह ठाकूर
अनुप्रिया सिंह पटेल
डॉ. सत्यपाल सिंह बघेल
राजीव चंद्रशेखर
शोभा करंडलाजे
भानूप्रताप सिंग वर्मा
दर्शना विक्रम जरदोष
मीनाक्षी लेखी
अनपुर्णा देवी
ए. नारायण स्वामी
कौशल किशोर
अजय भट्ट
बी. एल. वर्मा
अजय कुमार
चौहान देवूसिंह
भागवत खुपा
कपिल पाटील
प्रतिमा भौमिक
डॉ. सुभाष सरकार
डॉ. भागवत कराड
डॉ. राजकुमार सिंह
डॉ. भारती पवार
बिस्वेश्वर तडू
शंतनु ठाकूर
डॉ. मुंजपारा महेंद्रभाई
जॉन बरला
डॉ. एल. मुरगन
निसित प्रमाणिक
Union Cabinet Expansion : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील
नव्या सदस्यांची यादी pic.twitter.com/GjYQAXQzqU— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) July 7, 2021
या मंत्र्यांना डच्चू
रमेश पोखरियाल निशंक
संतोष गंगवार
देबोश्री चौधरी
संजय धोत्रे
बाबुल सुप्रियो
रावसाहेब दानवे-पाटील
सदानंद गौड़ा
रतन लाल कटारिया
प्रताप सारंगी
डॉ हर्षवर्धन
अश्विनी चौबे