योग्य गुंतवणूकच भविष्यातील आवश्यक खर्चांसाठी गरजेची असते. निवृत्तीनंतर आपला भार आपणच उचलावा, आरोग्यासाठी काही पुंजी जमा करावी असे तुम्हालाही वाटत असणार! तर मग जाणून घ्या कुठे केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.
ईपीएफ हि संघटीत क्षेत्रातील लोकांसाठी असलेली योजना आहे. यात कर्मचारी आणि कंपनी अर्धा अर्धा हिस्सा देते.
जीपीएफ हे केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना उपलब्ध असणारी सोय आहे.
पीपीएफ सर्वांना सक्तीचा नसतो. यात कर सवलत असून निवृत्तीनंतर याचा फायदा मिळतो.
व्याजदर काय?
ईपीएफ: 8.5%
जीपीएफ: 7.1%
पीपीएफ: 7.1%
मुदत
ईपीएफ चा कालावधी 58 वर्ष वय झाल्यानंतर संपतो.
जीपीएफ चा निवृत्तीनंतर कालावधी संपतो
तर पीपीएफ हे 15 वर्षांकरता असते.
मुदतीच्या आधी नोकरी संपल्यास काय?
नोकरी मुदती आधी थांबवावी लागली तर, 2 महिन्यात ईपीएफ कायमची बंद होते. नोकरी काही कारणाने गमावली तर जीपीएफ बंद होते आणि पीपीएफ मुलांचे शिक्षण किंवा वैद्यकीय कारणासाठी 5 वर्षांच्या कालावधी नंतर बंद करता येते.