सध्याच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्म म्हंटले कि सगळ्यात पहिले सर्वांच्या तोंडात नाव येते ते नेटफ्लिक्सचेच. भारत देशातच काय तर जगातील अनेक देशात नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सगळ्यात जास्त यूझर्स आणि सबस्क्रायबर आहेत. म्हणून तर नेटफ्लिक्सला ओटीटी प्लॅटफॉर्मचा किंग असे म्हणतात.
नेटफ्लिक्सवरील शो, वेबसिरीज आणि चित्रपट हे अनेकांना आवडत नाहीत? मात्र तरुण पिढीत नेटफ्लिक्सचे चाहते हे असंख्य आहेत. परंतु, हे पाहण्यासाठी लागणारे इंटरनेट पॅक्स हे अनलिमिटेड लागतात आणि एवढे असून देखील त्या पॅक्सचे किंमत खूप असते.
परंतु आता चिंता नको, आता तुमचा आवडत्या नेटफ्लिक्सवर तुम्ही इंटरनेटशिवाय टीव्ही शो आणि वेबसिरीज पाहू शकणार आहात! कसे ते जाणून घेऊया:
नेमके ते कसे?
◼️ पहिल्यांदा तर तुम्ही तुमच्या नेटफ्लिक्स अॅपला अपडेट करुन घ्या. अॅप अपडेट झाल्यानंतरच तुम्ही शो किंवा चित्रपट डाऊनलोड करु शकता.
◼️ तुम्ही तुमच्या आवडत्या शो किंवा चित्रपटावर क्लिक केल्यानंतर, त्या खाली तुम्हाला डाऊनलोड पर्याय दिसेल. विंडोज 10 वर डाऊनलोड करण्यासाठी, तुम्हाला प्रथम मेनूबार वर जावे लागेल. यानंतर, डाऊनलोड बटणावर क्लिक करून ते डाऊनलोड करावे लागेल.
◼️ त्यानंतर तुम्ही केव्हाही इंटरनेटशिवाय सर्व डाऊनलोड केलेले शो आणि चित्रपट पाहू शकता. म्हणजेच, जर तुम्ही प्रवास करत असाल तर, तुम्हाला इंटरनेटशिवाय हे सर्व शो पाहणे शक्य होणार आहे.