पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षेवरून गेल्या काही दिवसांपासून गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत होतं.
विद्यापीठाची प्रथम सत्र परीक्षा एप्रिलपासून घेण्याचे निश्चित झाले आहे. याचे सविस्तर वेळापत्रक 25 मार्च रोजी जाहीर केले जाणार आहे.
विद्यापीठाच्या निर्णयानुसार..:
9 फेब्रुवारीला झालेल्या बैठकीमध्ये 15 मार्चपासून परीक्षा घेण्यात येणार असल्याचं ठरलं होतं. पण जुन्या एका कंपनीला परीक्षेचा काम देणं हे नियमबाह्य असल्याचं स्पष्ट झाल्यामुळे 15 मार्चला परीक्षा घेणे शक्य नसल्याचं सांगण्यात आलं होते.
विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण पसरत असताना आता विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलून 11 एप्रिलला परीक्षा सुरू करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. परीक्षेचे स्वरूप हे बहुपर्यायी प्रश्न पद्धतीचे असणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची एसएसपीयु एज्युटेक फाउंडेशन ही कंपनी आता परीक्षा घेणार असल्याचं विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे
विद्यार्थ्यांच्या मनात असलेला संभ्रम आता मिटला असून 11 एप्रिल पासून परीक्षेला सुरुवात होणार असल्याचं ठरवण्यात आलेलं आहे.
दरम्यान, कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष ते अंतिम वर्षापर्यंतच्या परीक्षांचे स्वरूप हे एकसारखाच असून 50 गुणांची ऑनलाइन बहुपर्यायी परीक्षा विद्यापीठातर्फे घेण्यात येणार आहे.