खरंतर आजकाल अनेकांना थायरॉईडची समस्या होत असल्याचं चित्र समोर आले आहे. थायरॉईडमध्ये रुग्णांचे वजन वाढण्याससह किंवा कमी होण्यासह हार्मोन्सचं असंतुलनही होतं. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये थायरॉईडचा आजार होण्याचं प्रमाण दहा पटींनी अधिक असल्याचं एका अभ्यासानुसार सांगण्यात आले आहे.
आहारात या गोष्टींचे सेवन टाळा :
सोयाबीन
सोयबीन अनेक जण भाजीच्या रुपात खातात. सोयाबीनचं तेलही अनेक जण आहारात वापरतात. परंतु सोयाबीनमध्ये guitornoids असते
जे थायरॉईडचा आजार वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतं. सोयाबीन अधिक प्रमाणात खाल्यास शरीरात थायरोक्सिन वाढतं. थायरोक्सिन वाढल्याने थायरॉईडची समस्याही अधिक वाढते.
मीठ
थायरॉईडच्या ग्रंथी मीठाचा वापर करुन थायरोक्सिन हार्मोन्स बनवतात. त्यामुळे शरीरात आयोडिनची कमतरता झाल्यास, थायरॉईडचा त्रास वाढू लागतात.
त्यामुळे आयोडिन मीठ मर्यादेत खाण्याचा सल्ला डॉक्टरकडून दिला जातो. सैंधव मीठाचा आहारात वापर करु शकतात.
कोबी, फ्लॉवर
कोबी, फ्लॉवरमध्ये guitornoids नावाचं तत्व अधिक प्रमाणात आढळतं. त्यामुळे थायरॉईडची समस्या वाढू शकते. त्यामुळे थायरॉईड असलेल्या रुग्णाने या दोन भाज्या खाणं टाळावं
टिपणी : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.
🎯 हि हेल्थ टिप्स नक्की शेअर करा..!