राज्यात आजपासून कडक निर्बंध लागू; पाहा, काय सुरू काय असेल बंद! कोणाला कशी मिळणार मदत?
राज्यात आज रात्री 8 वाजल्यापासून पुढील 15 दिवस कडक निर्बंध लागू करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्यात येत्या 15 दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येत आहेत.
संचारबंदीच्या काळात आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील. सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. लोकल, बस अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहतील. जनावरांचे दवाखाने सुरु राहतील. पावसाळ्या पूर्वीची कामं सर्व सुरु राहतील. हॉटेल्स, रेस्टॉरंट टेक अवे सुरुच राहणार, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
[sc name=”adg”]
जीवनावश्यक सेवेत यांचा समावेश :
रुग्णालये, निदान केंद्रे, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा अधिकारी, औषध कंपन्या, औषधांचे उत्पादक आणि वितरक, लशींचे उत्पादन आणि वितरण, सॅनिटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरणांसाठीचा कच्चा माल आणि पूरक सेवा
हे सुरू राहणार
▪️ अत्यावश्यक सेवेतील उद्योग व कारखाने
▪️ पशुवैद्यकीय सेवा, प्राण्यांसाठीची निवारा केंद्रे, खाद्यपदार्थांची दुकाने
▪️ अन्नधान्य, भाज्या, फळे, दूध विक्रेते, बेकरी आणि खाद्यपदार्थांचे विक्रेते
▪️ शीत साखळी आणि गोदामे
▪️ सार्वजनिक वाहतूक (अत्यावश्यक सेवांसाठी)
▪️ पावसाळ्यापूर्वीची कामे
▪️ स्थानिक प्रशासनाच्या सर्व सार्वजनिक सेवा
▪️ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, वित्तीय संस्था, सेबी
▪️ दूरसंचार सेवा
▪️ मालाची वाहतूक, पाण्याचा पुरवठा
▪️ कृषीशी संबंधित कामे
▪️ सर्वप्रकारच्या वस्तूंची आयात-निर्यात
▪️ ई- कॉमर्स आणि मान्यताप्राप्त माध्यमे
▪️ पेट्रोल पंप
▪️ सर्वप्रकारच्या कार्गो सेवा
▪️ डेटा सेंटर आणि आयटी कंपन्या
▪️ सरकारी आणि खासगी सुरक्षा सेवा
▪️ इलेक्ट्रिक आणि गॅस पुरवठा सेवा
▪️ एटीएम
▪️ टपाल कार्यालये
▪️ बंदरे आणि त्याच्याशी संबंधित सेवा
▪️ जीवनरक्षक औषधांची वाहतूक
▪️ जीवनावश्यक वस्तूची निर्मिती करणारे कारखाने
▪️ आपत्ती व्यवस्थापनाची कामे, सेवा
[sc name=”adg”]
हे बंद राहणार
▪️ धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम
▪️ चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सभागृह
▪️ व्हिडिओ गेम पार्लर, वॉटर पार्क, मनोरंजन पार्क, जलतरण तलाव, जिम, क्रीडा संकुले
▪️ चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण
▪️ जीवनावश्यक सेवेत न येणारी सर्व दुकाने, मॉल, शॉपिंग सेंटर
▪️ बागा, समुद्रकिनारे, मैदाने
▪️ धार्मिक ठिकाणे, प्रार्थनास्थळे
▪️ सलून, स्पा, ब्युटी पार्लर
▪️ सर्व शाळा, महाविद्यालये (राज्याबाहेरील बोर्ड, विद्यापीठांच्या परीक्षा संबधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सूचनेनुसार होणार)
▪️ सर्व खासगी कोचिंग क्लास
[sc name=”adg”]
अत्यावश्यक सेवांना हे करावे लागणार
▪️ कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन
▪️ सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण
▪️ संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय
▪️ जीवनावश्यक सेवांसाठी गर्दी होऊ न देणे
▪️ काही ठिकाणी विक्रेत्यांच्या जागा बदलाव्यात
[sc name=”adg”]
जनतेला अशी मिळणार मदत
▪️ अन्न सुरक्षा योजने अंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांना एक महिना ३ किलो गहू व २ किलो तांदूळ, सात कोटी लोकांना लाभ
▪️ शिवभोजन थाळी : गरजूंना एक महिना मोफत
▪️ निवृत्तीवेतन योजना लाभार्थीं : संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या पाच योजनांतील लाभार्थ्यांना दोन महिन्यांकरिता प्रत्येकी एक हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य आगाऊ देणार. सुमारे 35 लाख जणांना फायदा
▪️ बांधकाम कामगारांसाठी : नोंदणीकृत सुमारे 12 लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अनुदान
▪️ घरेलू कामगार : 25 लाख घरेलू कामगारांसाठी भरीव निधी
▪️ फेरीवाले : प्रत्येकी पंधराशे रुपयांचे आर्थिक सहाय्य. पाच लाख जणांना लाभ
▪️ रिक्षाचालक : बारा लाख रिक्षाचालकांनाही प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य
▪️ आदिवासी कुटुंब : खावटी योजनेचा लाभ घेत असलेल्या सुमारे 12 लाख आदिवासी कुटुंबांना प्रति कुटुंब दोन हजार रुपयांचे सहाय्य
▪️ कोविडवरील सुविधा उभारणी : जिल्हास्तरावरील टाळेबंदी कालावधीतील व्यवस्थापनासाठी सुमारे 3 हजार 300 कोटी रुपयांची तरतूद
▪️ स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य शासन व इतर शासकीय संस्था यांना द्यावे लागणारे कर, शुल्क व इतर देय रकमा या एप्रिल व मे या दोन महिन्यांसाठी विनाव्याज भरण्यासाठी परवानगी
[sc name=”adg”]
https://myletstalks.in/big-news-section-144-to-be-implemented-in-the-state-for-next-fortnight/