आता तुमच्या चेहऱ्यानेच डाउनलोड होणार तुमचे आधार कार्ड; जाणून घ्या यासाठी संपूर्ण प्रोसेस…
आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. हे भारतीय नागरिकांचं ओळखपत्र आहे. आज कुठल्याही महत्त्वाच्या व्यवहारासाठी आपल्याला या आधार कार्डची गरज असते. आर्थिक व्यवहार असो किंवा सरकारी योजनांच्या लाभासाठी असो, प्रत्येक ठिकाणी हे आधार कार्ड एक महत्त्वाच्या कागदपत्राचं काम करतं. आधार कार्ड बनवणारी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण संस्था म्हणजेच UIDAI ही नागरिकांना अनेक सुविधा पुरवते. त्यापैकीच एक सुविधा फोटो अपडेट करणे ही देखील आहे..
जर तुम्हाला देखील आधार कार्डमधील तुमचा फोटो आवडत नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला आधार कार्डमध्ये तुमचा फोटो बदलण्याच्या सोप्या पद्धतीने सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा आवडता फोटो तुमच्या आधारमध्येही टाकू शकाल. आधार कार्डमध्ये तुमचे चित्र बदलण्याचे दोन मार्ग आहेत. ते जाणून घेऊया…
पहिली पद्धत
UIDAI च्या स्थानिक कार्यालयाला पत्र लिहून तुम्ही तुमचा नवा फोटो अपलोड करण्याची विनंती करु शकता. या अर्जासोबत तुम्हाला तुमचा नवा फोटो आणि आधार कार्डची प्रत जोडावी लागेल. जर तुमचा अर्ज स्वीकारण्यात आला तर केवळ 15 ते 20 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचं नवं आधार कार्ड नव्या फोटोसह मिळेल.
दुसरी पद्धत
पहिल्यांदा तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर नोदंणी फॉर्म डाऊनलोड करुन तो भरावा लागेल. आता तुमच्या जवळच्या कुठल्याही नोदंणी केंद्रावर (AEC) जाऊन हा फॉर्म तिथल्या आधार कार्डसंबंधी कामं करणाऱ्या अधिकाऱ्याला द्या. या फॉर्मसोबत तुम्हाला बायोमेट्रिक तपशील मागितला जाईल. त्यानंतर अधिकारी तुमचा नवा फोटो घेईल. या प्रक्रियेसाठी तुम्हाला 50 रुपयांचं शुल्कही द्यावं लागेल. 50 रुपयांवर तुम्हाला जीएसटीही द्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला एक पावती दिली जाईल. यामध्ये यूआरएन नंबर असेल. या नंबरच्या मदतीने तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट झालं की नाही ते तपसू शकता. यनंतर काहीच दिवसांत तुम्हाला नव्या फोटोसह तुमचं आधार कार्ड मिळेल.
अशी आहे ऑनलाइन पद्धत
1) सर्वप्रथम UIDAI ची अधिकृत वेबसाईट Google वर उघडा.
2) यानंतर, आधार मिळवा विभाग डाव्या हाताच्या स्क्रीनवर दिसेल. येथून तुम्ही आधार नोंदणी/अपडेट फॉर्म डाउनलोड करू शकता.
3) आता फॉर्म योग्यरित्या भरा आणि नंतर आधार नोंदणी केंद्रात सबमिट करा.
4) आपले बोटांचे ठसे, रेटिना स्कॅन आणि छायाचित्र पुन्हा केंद्रावर टिपले जातील.
5) फोटो अपडेट करण्यासाठी अर्ज स्वीकारताच, तुम्हाला यूआरएन किंवा अपडेट रिक्वेस्ट नंबर मिळेल.
6) या क्रमांकाद्वारे आपण आपला अर्ज ऑनलाईन ट्रॅक करू शकता.
7) तुम्हाला सुमारे 90 दिवसात अपडेटेड फोटोसह नवीन आधार कार्ड मिळेल.
पोस्ट द्वारे असं करू शकता अपडेट
1) तुम्हाला UIDAI पोर्टलवर जावे लागेल आणि तेथून ‘आधार कार्ड अपडेट करेक्शन’ फॉर्म डाउनलोड करावा लागेल.
2) आता या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरा.
3) यानंतर, UIDAI च्या क्षेत्रीय कार्यालयाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पत्र लिहा.
4) तुमचा स्व -प्रमाणित फोटो (स्वाक्षरी करून) त्याच्या पत्रासह जोडा.
5) यानंतर, UIDAI च्या कार्यालयाचा पत्ता लिहून फॉर्म आणि पत्र दोन्ही पोस्ट करा.
6) दोन आठवड्यांत, तुम्हाला नवीन छायाचित्रासह नवीन आधार कार्ड मिळेल.