67व्या राष्ट्रीय चित्रपटांच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या चित्रपटगृहात रिलीज झालेला ‘छिछोरे’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून गौरवण्यात आलं आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा चित्रपट छिछोरेला मिळाला आहे
यावर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी फिचर फिल्म विभागासाठी एकूण 461 चित्रपटांचा समावेश होता. 2019 मधील मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट विभागात तेरा राज्यांनी सहभाग घेतला होता. त्यातून हा पुरस्कार सिक्किमला जाहीर करण्यात आला आहे.
तर कंगना ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
अभिनेत्री अभिनेत्री कंगना रणौतला सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ आणि ‘पंगा’ या चित्रपटांसाठी कंगनाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत इंग्रजांविरोधात दिलेल्या लढाईची कथा सांगणाऱ्या ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’मध्ये कंगाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका बजावली होती.
25 जानेवारी 2019 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळाला नाही, मात्र कंगानाच्या अभिनयाचं यामधून कौतुक झाल्याचं पाहयला मिळालं.
त्याचप्रमाणे पंगा हा चित्रपट 24 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये कंगनाने जया निगम या महिला कब्बडी खेळाडूची भूमिका साकारली आहे.
दरम्यान, 2020 वर्षे कोरोना व्हायरसच्या महारोगराईच्या संकटात गेले आणि त्यामुळे आज २०१९ साली बनलेल्या चित्रपटांचे पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे.कोरोनामुळे मागील वर्षी राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली नव्हती. जी 3 मे,2020 रोजी पार पडणार होती. त्यामुळे यंदा 2019 सालातील पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे.