केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच CBSE ने दहावी आणि बारावी या शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वर्षांसाठी परीक्षांसंदर्भातील मोठा निर्णय घेतला आहे. 2022 मध्ये बोर्ड परीक्षा कशाप्रकारे होतील, याचा आराखडा सीबीएसईने तयार केला आहे. सीबीएसई बोर्ड 2022 मध्ये दोन वेळा परीक्षा घेणार आहे.
यासंबंधीचं परिपत्रक बोर्डाने जारी केलं आहे. यात परीक्षा कशा पद्धतीने होईल, सिलॅबस काय असेल, अंतर्गत मूल्यमापनाचे धोरण काय असेल याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
परीक्षेचा पॅटर्न कसा असेल?
फर्स्ट टर्मच्या अखेरीस बोर्ड टर्म-1 परीक्षा घेईल. ही परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2021 या दरम्यान असेल. बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. एमसीक्यू आणि रीजनिंग टाइप एमसीक्यू देखील विचारले जातील. प्रत्येक पेपर 90 मिनटांचा असेल. यात टर्म-1 च्या सिलॅबसमधूनच प्रश्व विचारले जातील. म्हणजेच संपूर्ण 50 टक्के सिलॅबसच्या 50 टक्के भागावरचे प्रश्न विचारले जातील.
Academic session 2021-22 of class 10th & 12th to be divided into 2 terms with approx 50% syllabus in each term. Syllabus for Board examination 2021-22 will be rationalized similar to that of last academic session to be notified in July 2021: Central Board of Secondary Education pic.twitter.com/8vyfPUhWX7
— ANI (@ANI) July 5, 2021
कसा असेल टर्म-2 परीक्षेचा पॅटर्न
टर्म-2 या इयर एंड परीक्षेचे आयोजनदेखील सीबीएसई द्वारेच केलं जाईल. उर्वरित 50 टक्के सिलॅबसमधूनच प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा मार्च-एप्रिल 2022 दरम्यान घेतली जाईल. पेपर 2 तासांचा असेल. या विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातील. म्हणजेच एमसीक्यू, लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रकारचे प्रश्न असतील.
कोरोनामुळे परिस्थिती सामान्य झाली नाही तर, टर्म-2 परीक्षा देखील 90 मिनिटांची असेल. टर्म-1 प्रमाणेच केवळ एमसीक्यू क्वेश्चन्स विचारले जातील. दोन्ही टर्म्सचे गुण विद्यार्थ्यांच्या एकूण बोर्ड निकालात समाविष्ट केले जातील.
काय असेल सिलॅबस? :
सीबीएसईने परिपत्रकात म्हटलं आहे की शैक्षणिक सत्र 2021-22 मध्ये मागील सत्राप्रमाणेच सिलॅबस असेल. यंदा देखील दहावी, बारावीच्या सिलॅबसमध्ये कपात केली जाईल. सिलॅबस विस्तृत माहिती जुलै 2021 cbse.nic.in वर जारी केली जाईल.
प्रॅक्टिकल आणि प्रोजेक्ट वर्क :
इंटरनल असेसमेंट/ प्रॅक्टिकल/प्रोजेक्ट वर्कला अधिक विश्वासार्ह बनवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याशिवाय घोषणा केलेल्या निर्देशांमुळे या सर्व गोष्टींना सारखे गुण देणं वैध होणार आहे.