एखाद्या महिलेनं जुळ्या मुलांना जन्म दिल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. अगदी एखाद्या महिलेनं तिळ्यांना म्हणजे एकावेळी तीन मुलांना जन्म दिल्याचं ऐकल्यावर तुम्हाला क्षणभर आश्चर्य देखील वाटलं असेल. पण एखाद्या माहिलेने एकाच वेळी दहा बाळांना जन्म दिल्याचे तुम्हाला सांगितले तर तुम्ही सांगणाऱ्याला नक्कीच वेड्यात काढाल.
मात्र आता असा प्रकार प्रत्यक्षात घडला आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये एका महिलेने एकाच वेळी 10 बाळांना जन्म दिला असून याची नोंद गिनीज बुकने घेतली आहे. गोसियामी धमारा सिटहोल असं या माहिलेचे नाव आहे. दक्षिण आफ्रिके महिला 37 वर्षीय गोसियामी धमारा सिटहोल एका वेळी 7 मुली आणि 3 मुलांना जन्म दिला आहे. गोसियामी धमारा सिटहोल गर्भवती असताना त्यांना 6 मुलं होऊ शकतात, असा अंदाज याआधीच डॉक्टरांनी वर्तवला होता. परंतु, 7 जून रोजी गोसियामी यांच्यावर शस्त्रक्रिया केली असता त्यांनी एका वेळी 10 बालकांना जन्म दिला.
या महिलेने दहा बाळांना एकाच वेळी जन्म दिल्याने डॉक्टरांना आश्चर्य वाटत आहे. सर्व बाळांची प्रकृती ठणठणीत आहे. यापूर्वी हे रेकॉर्ड मोरोक्कोमधील माली येथील हलीमा सीसी या महिलेच्या नावावर होते. हलीमा यांना 9 मुलं आहे. त्यात 5 मुली आणि 4 मुलांचा समावेश आहे. मात्र गोसियामा यांनी हलीमा यांचे रेकॉर्ड केवळ एका महिन्यातच तोडले आहे.