फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या इनिशिअल पब्लिक ऑफरिंग अर्थात आयपीओ (IPO) च्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करण्याऱ्यांसाठी चांगली कमाई करण्याची मोठी संधी आहे. सध्या बऱ्याच कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात दाखल होत आहेत. परंतु आता सगळ्यात नामवंत फूड कंपनी झोमॅटो चा आयपीओ भारतीय बाजारात आज दाखल होणार आहे.
झोमॅटोचा आयपीओ आज म्हणजे 14 जुलै रोजी खुला होणार असून 16 जुलै रोजी बंद होईल. यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून चांगली कमाई करू शकता. आजपासून हा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी खुला होत आहे. जाणून घ्या 14 ते 16 जुलै दरम्यान तुम्ही कशाप्रकारे बंपर कमाई करू शकता.
किती असेल प्राइस बँड?
झोमॅटोचा आयपीओ 14 जुलै रोजी खुला होणार असून 16 जुलै रोजी बंद होईल. कंपनीने या इश्यूकरता प्राइस बँड 72-76 रुपये निश्चित केला आहे. 27 जुलै रोजी कंपनीचा शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची अपेक्षा आहे.
किती असू शकते लॉट साइझ?
झोमॅटोच्या आयपीओची एक लॉट साईझ 195 शेअर्सची आहे. म्हणजे तुम्हाला किमान 195 शेअर्स खरेदी करावे लागतील. तर दोन लॉट बुक केल्यास तुम्हाला 290 शेअर्स मिळतील. अप्पर प्राईस लिमिट विषयी बोलायचे झाले तर, 14820 रुपये तुमच्या खात्यात ठेवून तुम्ही सुद्धा झोमॅटो मध्ये इन्व्हेस्ट करू शकता.
कसं आहे झोमॅटो कंपनीचं रिपोर्ट कार्ड?
जानेवारीत झोमॅटो चे व्हॅल्युएशन 5.4 अब्ज डॉलर होते. जूनमध्ये ते 8 अब्ज डॉलर झाले आहे. कोरोना काळात लोक घरून ऑर्डर करत होते त्यामुळे या होम डिलिव्हरी अँपची चांदी झाली आहे. तर दुसरीकडे एलआयसी देखील आता झोमॅटो च्या आयपीओ मध्ये इन्व्हेस्ट करणार आहे. एलआयसी बाजारात फार कमाल करत नाहीये मात्र, झोमॅटो द्वारे मोठी इन्व्हेस्टमेंट करण्याची त्यांची तयारी आहे.
(टीप : बाजारातील गुंतवणूक ही बाजार जोखमीच्या अधीन आहे. पैसे गुंतवण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. https://myletstalks.in/ वरून कोणालाही पैसे गुंतविण्याचा सल्ला दिला जात नाही)