🎞️ प्रतिक्षा संपली..!! ‘द फॅमिली मॅन 2’ चा नवा सिझन अखेर रिलीज
😍 अभिनेता मनोज वाजपेयीच्या ‘द फॅमिली मॅन 2’ या वेबसीरिजची सर्वत्र चर्चा आहे. ‘द फॅमिली मॅन’ने प्रेक्षकांच्या मनात अशी काही छाप सोडली की, लोक आता त्याच्या दुसर्या सत्राची आतुरतेने वाट पाहत होते.
🎭 बहुप्रतीक्षित वेब सीरिजसाठी प्रेक्षकांचा तोच उत्साह आणि प्रेम पाहून निर्मात्यांनी मनोज बाजपेयीअभिनीत सीरीज ‘द फॅमिली मॅन’ चा दुसरा सीझन जाहीर केला, जो आधी फेब्रुवारी 2021 मध्ये रिलीज होणार होता.
💁♂️ पण, काही कारणास्तव तो ठरल्या वेळेत रिलीज होऊ शकला नाही. तर हि वेब सीरिज अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली होती.
पहा या सिझन सिझन मध्ये नेमके काय?
It’s time to reunite with this family 🤝#TheFamilyManOnPrime, watch now: https://t.co/qrS0Bu0YtD@SrikantTFM @rajndk @BajpayeeManoj @Samanthaprabhu2 @Priyamani6 @sharibhashmi @sumank @Suparn @shreya_dhan13 @hinduja_sunny @DarshanKumaar @SharadK7 @ishahabali pic.twitter.com/qRgPXIOddp
— prime video IN (@PrimeVideoIN) June 3, 2021
😍 मात्र, आता मनोज बाजपेयी आणि समांथा अक्किनेनी अभिनित ही वेब बहुचर्चित सीरीज आज मध्यरात्री 12 वाजता अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाली आहे.
👉 बहुतांश भारतीय वेबसिरीजचे दुसरे सिझन फसलेत. प्रेक्षकांना ते आवडलेले नाहीत. पण द फॅमिली मॅन 2 त्याला अपवाद आहे. असे सांगतले जाते.
📌 दरम्यान, हि सीरिज पाहण्यासाठी प्रत्येकाला अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ अँप डाऊनलोड करावे लागणार असून, यासह तुम्हाला प्राईम व्हिडीओ सबस्क्रिप्शन देखील घ्यावे लागेल. या सबस्क्रिप्शनसाठी आपल्याला 999 रुपये द्यावे लागेल. त्याची वैधता हि 1 वर्षांची आहे.