नगरकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी करा विचार; अन्यथा हि कारवाई पडणार महागात!!
अहमदनगर शहरासह जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्ण वाढत असताना तर जिल्हातील दररोज वाढणाऱ्या ह्या रुग्ण संख्येमुळे संपूर्ण आरोग्यव्यवस्थेवर मोठा ताण पडला आहे. या वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी आता नावा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी देखील काढला आहे.
आजपासून अहमदनगर शहरात सर्व प्रमुख रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडाच्या कारवाई व्यतिरिक्त वैद्यकिय पथकामार्फत कोरोना टेस्ट देखील करण्यात येणार आहे. त्यामधे पॉझिटीव्ह आढळणाऱ्या नागरीकांना सरळ शासकिय कोव्हीड केअर सेंटर मधे दाखल करण्यात येईल,
तसेच त्यांच्या कुटुंबियांची देखील कॉन्टॅक्ट ट्रेसींग करून कोव्हीड टेस्ट करण्यात येईल याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी असे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी सांगितले आहे.
तर, याशिवाय अहमदनगर शहरात महापालिका आयुक्तांनी लागू केलेला कडक लॉकडाउनला मागील काही दिवसात थोड्या प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र, महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी एका दिवसात हा निर्णय बदलला. त्यांनी नगर शहरात पुन्हा एक जूनपर्यंत कडक लॉकडाउन जाहीर केला आहे. आयुक्तांचा हा निर्णय नागरिकांच्या टीकेच्या केंद्रस्थानी होता.
💁♂️ शहरात या गोष्टी राहणार सुरू
▪️ वैद्यकीय सेवा, औषध दुकाने
▪️ अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल पंप
▪️ घरपोच गॅस वितरण सेवा
▪️ सर्व बॅंका
▪️ दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री (सकाळी 7 ते 11)
▪️ पशुखाद्य विक्री (सकाळी 7 ते 11)
▪️ बी-बियाणे, खते व किटकनाशके दुकाने (सकाळी 7 ते 11)
▪️ पीठाची गिरणी
💁♂️ या गोष्टी राहणार बंद
▪️ किराणा दुकाने, तदानुषंगिक मालाची खरेदी-विक्री
▪️ भाजीपाला व फळे बाजार मालाची खरेदी-विक्री
▪️ सर्व खासगी अस्थापना
▪️ अंडी, मटण, चिकन व मासे विक्री
▪️ शेती निगडीत मशिनरी, पंप आदी
दरम्यान, शनिवारी व रविवारी सकाळी शहरातील रस्त्यांवर खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी केली असल्याचे सांगतले गेले असून, दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या. व सोशल डिस्टन्सिंगचा सर्वत्र फज्जा उडाला होता.