भारतात गेल्यावर्षी केंद्र सरकारने डेटा सुरक्षेच्या मुद्यावरून अनेक चिनी ॲप्लिकेशन्स बंद केले होते. यामध्ये पबजी या लोकप्रिय मोबाईल गेमचा देखील समावेश होता.पबजी (PUBG) गेमवर बंदी आणल्यानंतर इंडियन वर्जन असलेल्या ‘बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया’ (Battlegrounds Mobile India) गेम कधी लॉन्च केला जाणार याची प्रतीक्षा लागली असताना. अशातच आता युजर्सची प्रतीक्षा संपली असून आजपासून बॅटलग्राउंड मोबाइल इंडियासाठी रजिस्ट्रेशन करता येणार आहे.
तरुणाई कडून विशेष पसंती दिली जाणारा हा लोकप्रिय गेम आता पुन्हा येणार आहे. जून महिन्यात अखेर पर्यंत हा गेम लाँच होण्याची शक्यता आहे. 18 मे पासून गुगल प्ले स्टोअर वर बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया असं नाव बदलून पुनरागमन झालेल्या गेमच रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे.
कसे करणार रजिस्ट्रेशन…
सर्व प्रथम Google Play Store वर जाऊन Battleground Mobile India या नावाने सर्च करा
त्यानंतर तुम्हाला या नावाचे अनेक गेम दिसेल. त्यामध्ये Coming Soon हे दिसेल. त्यावर क्लिक करा आणि प्री-रजिस्ट्रेशन लिंकवर टॅप करा. पण डेव्हलपर्स Krafton असावा.
हा गेम सध्या डाऊनलोडसाठी उपलब्ध नसून, ही गेम फक्त प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध आहे. म्हणजे जेव्हा गेम सर्वांसाठी सुरु होईल तेव्हा याची माहिती तुम्हाला दिली जाणार आहे.
त्वरित प्री-रजिस्ट्रेशन करण्यासाठी क्लिक करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.pubg.imobile
प्री-रजिस्टर करण्यासाठी युजर्सला हे रिवॉर्ड मिळतील : रिकॉन मास्क, रिकॉन आउटफिट, सेलिब्रेशन एक्सपर्ट टायटल आणि 300 एजी ही नावे नव्या करन्सीशीसंबंधित असेल. हे रिवॉर्ड पॉईंट्स फक्त प्री-रजिस्ट्रेशन करणाऱ्या युजर्सला मिळणार आहे.
अनेक खेळाडू हा खेळ खेळू शकतील. PUBG सारखेच जो खेळाडू शेवटपर्यंत खेळेल तोच विजेता ठरेल.
दरम्यान, या गेमचे प्री रजिस्ट्रेशन केल्यास रिवॉर्ड मिळणार असून हे रिवॉर्ड केवळ आणि केवळ भारतीयांसाठी असल्याचे कंपनीने सांगितले आहे. ज्या युजर्सचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे त्यांना आपल्या आई-वडिलांचा संपर्क क्रमांक देणे अनिवार्य असेल.