कोरोना महामारीपासून बचाव अन् रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयनं दिले फायद्याचे सल्ले
कोरोना महामारीपासून करण्यासाठी प्रत्येकाने शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आयुष मंत्रालयानं कोरोनापासून बचाव करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. त्यासाठी रोजच्या रोज पोषक आहार आणि शरीराचा व्यायाम करणे देखील गरजेचे आहे.
साधायचा काळात कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण घरगुती उपायांचा आधार घेत आहे. प्रामुख्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी घरगुती तयार केलेला काढा, बाजारात मिळणारी औषधं तसेच आयुर्वेदाचाही आधार घेण्यात येत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सर्वांना COVID-19 पासून बचाव करायचा असेल तर, सर्वांनी सर्वातआधी सर्व कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे.
आयुष मंत्रालयानं कोरोनापासून बचाव करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते. व आयुर्वेदात हे घरगुती उपाय अत्यंत प्रभावी ठरत असल्याचं सांगितलं जात आहे.
आयुष मंत्रालयानं सांगितलेले नेमके उपाय कोणते?
▪️ दररोज वापरात गमर पाण्याचं सेवन करा. सकाळी व संध्याकाळी गरम पाण्यामध्ये चिमुटभर मीठ आणि हळद टाका आणि त्यानतंर पाण्यानं गुळण्या करा.
▪️ घरी तयार केलेलं ताजं आणि पचण्यास हलकं असणाऱ्या अन्नाचं प्रामुख्याने सेवन करा. जेवणात जीरं, धने, हळद, सुंठ आणि लसणाचा वापर मोठ्याप्रमाणात करा.
▪️ व्हिटॅमिन सीसाठी लिंबू आणि आवळ्याचं सेवन करणे कधीही चांगले. आवळा आणि लिंबू यांचं समावेश असणाऱ्या पदार्थांचाही वापर करु शकता.
▪️ दररोद कमीत कमी 30 मिनिटांसाठी योग, प्राणायाम आणि मेडिटेशन करा.
▪️ दिवसा झोप घेण्याऐवजी रात्री 7 ते 8 तासांसाठी शांत झोप घ्या.
▪️ रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सकाळी-संध्याकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासह च्यवनप्राश खा.
▪️ रात्री हळदीच्या दूधाचं सेवन करा. एक ग्लास दूधात जवळपास अर्धा चमचा हळद एकत्र करुन त्याचं सेवन करा.
▪️ दररोज दिवसातून दोन वेळा जेवणानंतर कोमट पाण्यासोबत गुळवेल 500 मिलीग्रॅम/अश्वगंधा 500 मिलीग्राम घेऊ शकता.
▪️ तुळस, काळी मिरी, सुंठ आणि दालचिनी यांपासून तयार करण्यात आलेला हर्बल चहा किंवा काढ्याचं सेवन करा.
▪️ सकाळ-संध्याकाळी नाकात तिळाचं तेल, खोबऱ्याचं तेल किंवा गाईच्या दूधापासून तयार केलेलं तूप घाला.
▪️ कोरडा खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी वाफ घ्या. वाफ घेताना पाण्यात पुदिन्याची पानं, ओवा किंला कापराचा वापर करु शकता.
▪️ दिवसातून दोन वेळा लवंग किंवा ज्येष्ठमध पावडर मध किंवा साखरेसोबत एकत्र करुन खा. यामुळे खोकला, घशातील खवखवीपासून आरम मिळेल.