ब्रेकिंग..! इयत्ता 10वी ची परीक्षा रद्द!
▪️ राज्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. नव्या बाधितांचा आकडा दररोज एक नकोसा विक्रम प्रस्थापित करत आहे.
▪️ अशातच आज शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी 10वी च्या परीक्षाबदल एका मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. वाचा सविस्तर : https://bit.ly/3aof59A
मुख्यमंत्री उद्या करणार संपूर्ण लॉकडाउनची घोषणा
▪️ गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
▪️ तर राज्यात येत्या काही तासांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लावावा लागेल”, अशी महत्त्वाची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर अस्लम शेख यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
काँग्रेस नेते राहुल गांधींना कोरोनाची लागण
▪️ काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण. सौम्य लक्षणं आढळल्यानंतर चाचणी केली असता करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची स्वत: ट्विट करत दिली माहिती.
PPE कीटसाठीही मागितले पैसे, मयताच्या टाळू वरचे लोणी खाण्याचा प्रकार उघड
▪️ कोरोनाच्या महामारीने जनता हैराण झाली असताना वसई विरार महानगरपालिकेच्या स्मशानभूमीत मयताच्या टाळू वरचे लोणी खाण्याचा प्रकार समोर आला आहे.
▪️ मृत्यू नंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पीपीई कीटसाठी मयतांच्या नातेवाईकांकडून 7 कीट साठी 4500 रुपये उकळले जात असल्याचा धक्कादायक माहिती मृताच्या नातेवाईकांनी दिली आहे.
नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सची फलंदाजी
▪️ इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या तुल्यबळ संघांमध्ये सामना होत आहे.
▪️ चेन्नईत धावांचा पाठलाग करणे अवघड जात असल्याने या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
▪️ मुंबईच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज अॅडम मिलनेच्या जागी ऑफस्पिनर जयंत यादवला मुंबईने संधी दिली आहे.