पिझ्झा हे लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे खाद्य! लवकर खाता येणारा, चविष्ट आणि पोट भरवणारा पदार्थ म्हणून सध्याच्या जनरेशनमध्ये या पदार्थाची ओळख आहे! आपण याला पदार्थ काय म्हणतोय? हे चक्क अनेकांचे “मिल” आहे! खरंच, अनेकजण पिझ्झावर दिवस काढू शकतात.
हा इतका लाडका पिझ्झा नेमका कोणी पहिल्यांदा केला? कोणत्या देशातील आहे हा पदार्थ? आपल्या देशापर्यंत यायला त्याला किती काळ लोटावा लागला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्या मध्ये असणाऱ्या इन्ग्रेडीएन्ट्स प्रमाणे आपण सखोल चिकित्सा करून जाणून घेऊ!
ही गोष्ट आहे 1760 च्या आसपासची! युरोपच्या नापोली बंदरावर काम करणारे कष्टकरी, मजूर लोक एका खानावळीत जेवत. निवांत बसून जेवायला त्यांना वेळच नसे. अशात त्यांना चटकन काय बरं देता येईल जे ते उभ्याने सुद्धा खाऊ शकतील, याचा विचार त्या खानावळीवाल्याने केला.
मग मैद्याच्या ब्रेड सारख्या रोटीवर जवळ आणि सहज मिळणाऱ्या भाज्या त्याने पेरल्या, त्यावर घरगुती तयार केलेल्या चिजचे तुकडे टाकले, मसाला, मीठ घातले. ती रोटी गरम करून त्या मजुरांना दिली. त्यांना हा पदार्थ खूप आवडला.
काही काळाने नापोली बंदर इटलीत विलीन झाले तसा पिझ्झाही! तेथील मार्गारिटा राणीने एक दिवस उंबेर्तो राजाला राज्यात फेरफटका मारू म्हणून बाहेर नेले. राज्यात लोक काय खातात कसे जगतात याची तिला उत्सुकता असेल.
यातूनच तिने पिझ्झा खाल्ला आणि तिला तो खूप आवडला! राणीला आवडला म्हणजे सगळीकडे त्याचा प्रचार, प्रसार झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर होरपळलेल्या युरोपियन जनतेने अमेरिकेची वाट धरली.
यातून हा पिझ्झा अमेरिकेत आला. अनेक देशांच्या खाद्य संस्कृती घेऊन त्यात बदलही झाले. नंतर हा पिझ्झा आला भारतात आणि आता तर त्या राजा-राणीच्या नावाने पण पिझ्झा आहे.
भारतीय तडका देखील या पिझ्झाला आहे. आपल्या तरुण पिढीला तर अगदी जवळचा वाटणारा हा पदार्थ झाला आहे. तर हा आहे या पिझ्झाचा जन्मापासूनचा इतिहास!