चिंताजनक! कोरोना रुग्णवाढीने गाठला नवा उच्चांक
भारतातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती अतिशय धोकादायक वळणावर पोहचलीय, असं म्हणायला आता काही हरकत नाही. गेल्या 24 तासांत देशात दैनंदिन रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. याआधी 5 एप्रिलला पहिल्यांदाच एक लाखांचा टप्पा पार करत सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ नोंदवण्यात आली होती.
[sc name=”adg” ]
कोरोना संक्रमणाचा देशभर होणारा फैलाव चिंतेत अधिक भर टाकतोय. आज सकाळी समोर आलेली कोरोनाची आकडेवारी धोक्याची घंटा ठरतेय. देशात गेल्या 24 तासांत 01 लाख 15 हजारांच्या घरात नवीन कॉर्न संक्रमित रुग्ण आढळले आहेत.
कोरोना संक्रमणकाळात ही दुसरी वेळ आहे जेव्हा कोरोना संक्रमितांची एका दिवसाच्या संख्येनं एक लाखांचा टप्पा ओलांडलाय. याअगोदर रविवारी (सोमवारी सकाळी जाहीर झालेली आकडेवारी) कोरोना संक्रमित 01 लाख 03 हजार 558 रुग्ण आढळले होते.
[sc name=”adg” ]
दरम्यान, आज जाहीर झालेली संख्या ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी रेकॉर्डब्रेक रुग्णसंख्या सांगतले जाते. याचसोबत देशात कोरोना संक्रमणाचे तब्बल 01 कोटी 17 लाख 99 हजार 746 रुग्ण झाले आहेत. सोबतच, देशात सक्रीय रुग्णांचा आकडा 08 लाखांचा वर पोहचलाय. देशात सध्या 08 लाख 43 हजार 779 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गेल्या 24 तासांत 631 जणांचा मृत्यू झाला आहे. याचसोबत कोरोना संक्रमणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 1 लाख 66 हजार 208 वर पोहचलीय. तर भारतात महाराष्ट्र (31 लाख 13 हजार 354), केरळ (11 लाख 37 हजार 590), कर्नाटक (10 लाख 20 हजार 434), आंध्र प्रदेश (9 लाख 09 हजार 002) आणि तामिळनाडू (9 लाख 03 हजार 479) हे सर्वाधिक प्रभावित राज्य ठरलेत.
[sc name=”adg” ]
गेल्या 6 दिवसातील संक्रमित रुग्णांची संख्या
01 एप्रिल : 61 हजार 398
02 एप्रिल : 89 हजार 023
03 एप्रिल : 92 हजार 994
04 एप्रिल :01 लाख 03 हजार 494
05 एप्रिल : 96 हजार 563
06 एप्रिल : 01 लाख 15 हजार 312
दरम्यान, आतापर्यंत देशात 25 कोटी 14 लाख 39 हजार 598 नमुन्यांची कोविड तपासणी करण्यात आलीय. यातील 12 लाख 08 हजार 329 नमुन्यांची तपासणी मंगळवारी एकाच दिवशी पार पडल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR) दिलीय.
[sc name=”adg” ]