वॅलेंटाईन वीक मधील सर्वात महत्वाचा आणि भारी दिवस म्हणजे ‘हग डे’, जो सर्व प्रकारच्या नात्यात गोडवा निर्माण करू शकतो. प्रत्येक वर्षाच्या हा दिवस 12 फेब्रुवारीला ‘हग डे’ साजरा करण्यात येतो. प्रेमात पडलेल्यांसाठी जोडप्यांसाठी गुलाबी महिना म्हणजे हा फेब्रुवारी. कारण तरुणांचा आवडता सन म्हणजे ‘वॅलेंटाईन डे’ याच महिन्यात असतो.
त्यासाठी प्रत्येकानी आठवडाभर वॅलेंटाईन वीकचा भरगच्च कार्यक्रम आखला गेला आहे. या वॅलेंटाईन वीक मध्ये आतापर्यंत रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे आणि प्रॉमिस डे असे अनेक दिवस पार पडले आहेत. आता याच्या पुढचा महत्वाचं दिवस म्हणजे ‘हग डे’, अर्थात जादुच्या झप्पी…
प्रेमाने आपल्या आवडत्या व्यक्तीच्या कुशीत सामावून जाणे यासारखे दुसरे सुख काय असेल. कुणाला मिठी मारणे किंवा कुणाला मिठीत घेण्यानं प्रेम आणि विश्वास नक्कीच वाढतो. तसंही प्रेमानं मिठी मारण्यासाठी कोणत्याही एका विशिष्ट दिवसांची गरज नसते, पण आजचा दिवस काही खासच असतो.
मुन्ना भाई एमबीबीएस या चित्रपटातील जादूची झप्पी आपण पाहिलीच असेल. त्यावरुन एका मिठीत किती ताकत असते याची नक्कीच प्रचिती होते. मिठी मारल्यामुळे समोरच्या व्यक्तीचा राग देखील कमी होतो, आणि प्रेमही वाढते. काही वेळा आपण आपल्या भावना शब्दातून व्यक्त करू शकत नाही. त्या भावना आनंदाच्या किंवा दुःखाच्याही असू शकतात. मग एखाद्याला मिठी मारुन त्या भावनांना आपण वाट मोकळी करुन देऊ शकतो.
सांग तिला… तुझ्या मिठीत आहे जग सारा….. असं सांगत कवी कुसुमाग्रजानी आपल्या कवितेच्या माध्यमातून प्रेमविरांना आवाहन केलंच आहे